anandnagri logo
मुख्य बातम्या:
भारत भक्कम स्थितीत
विशाखापट्टणम (वृत्तसंस्था)- ऑफस्पिनर रविचंद्रन आश्विनच्या 5 बळींमुळे पहिल्या डावात 200 धावांची आघाडी मिळविणाऱ्या भारतीय संघाने कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर भारताने इंग्लंडवर 298 धावांची एकूण आघाडी घेत पकड मजबूत केली. भारताने दुसऱ्या डावात अवघ्या 40 धावांत 3 फलंदाज गमावले होते. त्यानंतर कोहली (नाबाद ...
पाच विकेट घेण्याचा  विचार केला नव्हता-आश्विन
विशाखापट्टणम  (वृत्तसंस्था)- इंग्लंडविरुद्ध यापूर्वी कधीच पाच बळी घेतले नव्हते आणि त्याबाबत कधी विचारही केला नव्हता, अशी प्रतिक्रिया भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन आश्विनने व्यक्त केली. शनिवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना आश्विन म्हणाला, मी जर चांगली गोलंदाजी केली तर पाच बळी घेऊ शकतो, याची कल्पना होती. सर्वच चेंडू ...
रुट, अलीमुळे इंग्लंड सुस्थितीत, पहिल्या दिवसअखेर 4 बाद 311
राजकोट  (वृत्तसंस्था)- भरवशाचा फलंदाज जो रुट आणि अष्टपैलू खेळाडू मोईन अली यांच्या भक्कम भागिदारीच्या जोरावर इंग्लंड संघ भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात मजबूत स्थितीत पोहोचला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडची धावसंख्या 4 बाद 311 इतकी झाली होती. दिवसअखेर मोईन अली 99 तर बेन स्टोक्स 19 धावांवर नाबाद आहे. इंग्लंडचा ...
अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर  भारताच्या मध्यफळीची जबाबदारी
नवी दिल्ल्ी (वृत्तसंस्था)- भारत आणि इंग्लड यांच्यातील कसोटी सामन्यात भारत इंग्लडवर निर्विवाद वर्चस्वासाठी प्रयत्नशील असेल. भारताला इंग्लंडवर निर्विवाद वर्चस्व मिळविण्यासाठी अजिंक्य रहाणेची भारतीय संघातील भूमिका महत्वपूर्ण असणार आहे. अजिंक्य रहाणेने तिन्ही स्तरातील खेळामध्ये आपली खेळी सर्वोच्च असल्याचे सिद्ध केले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या खेळीनंतर ...
विराट कोहलीच ठरेल सचिनचा वारसदार, मोडणार सर्व विक्रम
हैदराबाद (वृत्तसंस्था)- भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली हाच सचिन तेंडुलकरचे विश्वविक्रम मोडून त्याचा खरा वारसदार ठरेल असा विश्वास बहुतेक नेटकऱ्यांना वाटतो. विराट कोहलीच्या वाढदिवशी म्हणजे 5 नोव्हेंबर रोजी ईनाडू इंडियाने एक नेट कौल घेतला होता. त्यामध्ये आम्ही असा प्रश्न विचारला होता की विराट कोहली सचिन तेंडुलकरचे विश्वविक्रम मोडेल असा विश्वास तुम्हाला वाटतो का? ...
विराटप्रेमी चिमुकल्याचा कव्हर ड्राइव्ह पाहण्यासाठी दिल्लीत जमते गर्दी!
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)-  क्रिकेटचे वेड आपल्याकडे नवीन नाही. त्यातही क्रिकेटमध्ये बहुतांश जणांना फलंदाजी करणे किंवा पाहणे अधिक पसंद आहे. मग यामध्ये सध्या कुणाला विराट कोहलीची फलंदाजी पाहणे आवडते तर कुणाला आजही मास्टर ब्लास्टर सचिनचा कव्हर ड्राईव्ह युट्यूबर पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो. क्रिकेटचे वेड असणाऱ्यामध्ये सध्या विराटच्या पावलावर पाऊल ठेवण्याची इच्छा ...
29 साल बाद...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - भारत 29 र्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद भूषवत असून, या वेळी क्रिकेटचे जन्मदाते इंग्लंड संघाचे आव्हान राहणार आहे. भारताने यापूर्वी 1986-87 मध्ये पाकिस्तानविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद भूषविले होते. त्यानंतर 29 वर्षांनी इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद भूषवत आहे. ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920