anandnagri logo
मुख्य बातम्या:

कोहलीच्या नकारात्मक विचारसरणीमुळे संघ धोक्यात

By आनंदनगरी वेब टीम | Tue 07-03-2017 | 11:07:52 am

फोटो

नवी (वृत्तसंस्था) - ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज आणि राष्ट्रीय निवड समिती सदस्य मार्क वॉ यांनी भारतीय कर्णधार विराट कोहली सध्या एकाग्रता टीकवण्यात अपयशी ठरत असल्याचे वक्तव्य केले आहे. कोहलीची नकारात्मकतेमुळे संघाच्या कामगिरीवर परिणाम होत असल्याचेही वॉ म्हणाले. मार्क वॉ यांनी फॉक्स स्पोर्ट्‌सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, कोहलीला आपल्या खेळात एकाग्रता ठेवण्यात अपयश येत आहे. कोहलीने खेळलेला पहिला चेंडू त्याच्या थायपॅडवर आदळला आणि तो लेग साईडवर असलेल्या दोन क्षेत्ररक्षकांना घेऊन चिंतीत होता. पण भारतीय फलंदाजांसाठी ही सर्वसाधारण गोष्ट आहे.कोहली उत्कृष्ट खेळाडू आहे.
नेथन लायनच्या गोलंदाजीवर कोहली पायचीत बाद झाला होता. कोहली सध्या चुकीच्या विचारसरणीने खेळत आहे. त्याचा हा नियमीत खेळ नाही. सामन्यात आत्मियतेने खेळण्याची गरज असल्याचे कोहली सांगत असला तरी तशी खेळी प्रत्यक्षात होताना दिसली नाही, असे वॉ म्हणाले.
फलंदाजीवेळी आपल्या अगदी जवळ क्षेत्ररक्षणासाठी खेळाडू उभे असल्याने फिरकीने उसळी घेऊन बॅटची कडा घेतली तर आपण झेलबाद होऊ, अशी भीती बाळगून खेळल्याने भारतीय फलंदाज विकेट गमावत आहेत. एक फलंदाज म्हणून तुम्हा असा विचार ठवून फलंदाजी करणे चुकीचे आहे, असे वॉ म्हणाले. स्टीव ओकिफ आणि नेथन लायन यांच्या गोलंदाजीवर भारतीय फलंदाज बचावात्मक खेळताना दिसत असल्याचेही ते पुढे म्हणाले.
बंगळुरूची खेळपट्टी पुण्यासारखी धोकादायक आहे, असे मला अजिबात वाटत नाही. चेंडूला उसळी मिळत नसल्याचेही आपण पाहिले. 
त्यामुळे भारतीय फलंदाजांना चांगली धावसंख्या उभारता आली असती.
चेंडूला थोड्याप्रमाणात फिरकी मिळत असल्याचे मान्य असले तरी आणखी चांगली धावसंख्या नक्कीच उभारण्याची संधी भारताला होती, असेही ते वॉ म्हणाले.
बंगळुरू कसोटीत भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण भारताचे फलंदाज ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नेथन लायनच्या फिरकीसमोर निष्प्रभ ठरले. नेथन लायनने तब्बल आठ विकेट्‌स घेतल्या आणि भारताला पहिल्या डावात फक्त 179 धावा करता आल्या.

 

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920