anandnagri logo
मुख्य बातम्या:

मायकेल क्लार्क बनला रिक्षा ड्रायव्हर

By आनंदनगरी वेब टीम | Fri 03-03-2017 | 12:44:40 pm

फोटो


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसाठीच्या समालोचक चमूमध्ये मायकेल क्लार्कचा समावेश आहे
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क निवृत्तीनंतर क्रिकेटपासून दूर असला तरी वैयक्तिक आयुष्यात काहीतरी नवीन शिकण्याचा त्याने प्रयत्न केला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसाठीच्या समालोचक चमूमध्ये मायकेल क्लार्कचा समावेश आहे. त्यामुळे मायकेल देखील सध्या भारतात आहे. पुण्यातील कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारतीय संघावर दमदार विजय प्राप्त केल्यानंतर बंगळुरूत होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघ पूर्णपणे सज्ज झाले आहेत. यादरम्यान, मायकेल क्लार्कने बंगळुरूतील लोकप्रिय टूक-टूक रिक्षा चालवण्याचा अनुभव घेतला. मायकेलने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात एक रिक्षा ड्रायव्हर मायकेलला रिक्षा चालवण्याचे धडे देत असल्याचे दिसते. रिक्षा ड्रायव्हरकडून सर्व माहिती घेतल्यानंतर मायकेलने बंगळुरूच्या रस्त्यावर रिक्षा चालवण्याचा आनंद देखील लुटला. बंगळुरूत मी टूक-टूक चालवण्यात प्राविण्य मिळवत असून ज्या शहरातून माझ्या प्रवासाची सुरूवात झाली त्या शहरात पुन्हा आल्याने मी खूप आनंदी आहे, असे मायकेलने नमूद केले आहे.
मायकेल क्लार्कने आपल्या क्रिकेट करिअरची सुरूवात 2004 साली बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममधूनच केली होती. क्लार्कने आपल्या पहिल्याच कसोटीत शतकी कामगिरी केली होती. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विरुद्धची दुसरी कसोटी येत्या 4 मार्चपासून बंगळुरूत खेळवली जाणार आहे.रिक्षा चालवण्याच्या अनुभवासोबतच मायकेलने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची भेट घेतल्यानंतरचाही एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 4 कसोटी कसोटी सामने खेळणार असून मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920