anandnagri logo
मुख्य बातम्या:

राष्ट्रगीतावेळी च्युईंगम चघळल्याप्रकरणी परवेझ रसूलला वडिलांनी सुनावले

By आनंदनगरी वेब टीम | Fri 03-03-2017 | 12:44:36 pm

फोटो


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - राष्ट्रगीतावेळी आपल्या तोंडात काहीही न ठेवण्याची जबाबदारी परवेझची होती.
इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी- 20 सामन्यापूर्वी राष्ट्रगीतावेळी उभे असताना च्युईंगम चघळण्याच्या प्रकरणावरून जम्मू-काश्मीरचा युवा खेळाडू परवेझ रसूल सोशल मीडियावर जोरदार टीका करण्यात आली. नुकतेच परवेझने एका मुलाखतीत या प्रकरणावर आपला खुलासा देत. टीकाकारांवर शरसंधान केले होते. क्रिकेटपटूंना खेळू द्या, त्यांना राजकारणात खेचू नका, असे विधान परवेझ रसूलने केले होते. मात्र, नेटिझन्ससोबतच आता खुद्द रसूलच्या वडिलांनीही त्याच्या च्युईंगम चघळण्याच्या प्रकरणावरून त्याला सुनावले आहे.
राष्ट्रगीतावेळी च्युईंगम चघळण्याचे प्रकरण काही नवे नाही, याआधी देखील अनेक क्रिकेटपटूंनी असे केले आहे. पण राष्ट्रगीतावेळी आपल्या तोंडात काहीही न ठेवण्याची जबाबदारी परवेझची होती. त्याने काळजी घ्यायला हवी होती, असे परवेझच्या वडिलांनी म्हटले. माजी कर्णधार सौरव गांगुलीने जेव्हा राष्ट्रगीतावेळी च्युईंगम चघळला होता. तेव्हा त्याला लक्ष्य करण्यात आले नाही. मात्र, काश्मीरमधील अस्थिर स्थितीमुळे परवेझ रसुलला लक्ष्य करण्यात आले, असेही ते म्हणाले.
राष्ट्रगीतावेळी च्युईंगम चघळण्याचा प्रकार याआधी अनेक खेळाडूंनी केला होता. माझा मुलगा त्यात अपवाद नाही. पण त्याने नक्कीच काळजी बाळगण्याची गरज होती, असे रसूलच्या वडिलांनी सांगितले. परवेझकडून यापुढे अशी चूक होणार नाही, याची काळजी घेण्यासही सांगितल्याचे ते म्हणाले.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920