anandnagri logo
मुख्य बातम्या:

कर्णधारपदाच्या अखेरच्या सामन्यात धोनीचा सत्कार

By आनंदनगरी वेब टीम | Wed 11-01-2017 | 12:15:37 pm

फोटो

♦ कर्णधार धोनी आणि युवराजचा धमाका, सराव सामन्यात अर्धशतके
मुंबई (वृत्तसंस्था)- इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात भारत अ संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा क्रिकेट क्लब ऑफ इंडियाकडून सत्कार करण्यात आला. संघाचा कर्णधार म्हणून धोनीचा हा अखेरचा सामना पाहण्यासाठी मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर असंख्य चाहत्यांनी उपस्थिती लावली. सामना सुरू होण्याआधी भारतीय संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधाराचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. धोनीने 5 जानेवारी रोजी भारताच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे इंग्लडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्त्व विराट कोहलीकडे सोपविण्यात आले आहे. येत्या 15 जानेवारी रोजी पुण्यात भारत विरुद्ध इंग्लंड हा पहिला एकदिवसीय सामना खेळविला जाणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या या मालिकेसाठी मंगळवारी इंग्लंडविरुद्ध भारताच्या अ संघाचा सराव सामना खेळविण्यात येत आहे. धोनीना सन्मानित करण्यात आल्याचे ट्विट बीसीसीआयने केले आहे.
धोनीसारखे यश मोजक्याच कर्णधारांना- युवराज सिंग- आयसीसीच्या तिनही मोठ्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्त्व करणारा महेंद्रसिंग धोनी हा पहिलाच कर्णधार आहे. आपल्या कर्णधारी कारकिर्दीच्या पदार्पणातच धोनीने भारतीय संघासाठी पहिला ट्वेन्टी-20 विश्वचषक जिंकला. धोनीच्या नेतृत्त्वात संघाने कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान काबीज केले. धोनी भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. कर्णधारी गुणांसोबतच धोनी यष्टीरक्षणाच्याबाबती देखील तितकाच चपळ आणि कौशल्यपूर्ण आहे. धोनीच्या नावावर कसोटी विश्वात 38 स्टम्पिंग, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 92, तर ट्वेन्टी-20 मध्ये 22 स्टम्पिंग जमा आहेत. धोनीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने तब्बल 28 वर्षांनी विश्वचषक जिंकला. वानखेडे स्टेडियमवर 2011 सालच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीलंकेवर मात करून भारतीय संघाने विश्वचषक उंचावला होता. धोनीने आतापर्यंत 9110 धावा ठोकल्या असून 183 ही त्याची सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या आहे.
कर्णधार धोनी आणि युवराजचा धमाका, सराव सामन्यात अर्धशतके -  इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात भारताच्या अ संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने धमाका केला. धोनीने 40 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 68 धावा ठोकल्या.
अंबाती रायडूचं शतक, शिखर धवनच्या 63 आणि सिक्सर किंग युवराज सिंहच्या 56 धावांच्या जोरावर, भारताच्या अ संघाने निर्धारित 50 षटकात 4 बाद 304 धावांचा डोंगर उभा केला.
मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवरील या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं.
भारताकडून सलामीसाठी मनदीप सिंह आणि शिखर धवन आले. मनदीप 8 धावा करुन माघारी परतला. तर धवनने 84 चेंडूत 63 धावा केल्या.
अंबाती रायुडूने 97 चेंडूत 11 चौकार आणि षटकाराच्या सहाय्याने शतक झळकावलं आणि तो रिटायर्ड हर्ट झाला.
दुसरीकडे टीम इंडियात परतलेल्या युवराज सिंहने 48 चेंडूत 56 धावा ठोकल्या. यामध्ये त्याने सहा चौकार आणि 2 षटकारांची बरसात केली.
मग अंतिम षटकांत धोनीने इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसं काढली. धोनीने शेवटच्या षटकात तब्बल 23 धावा कुटल्या. धोनीने 40 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 68 धावा ठोकल्या. त्यामुळे भारताला 50 षटकात 4 बाद 304 धावांपर्यंत मजल मारता आली.
►चाहत्यांची मोठी गर्दी
मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर भारत अ आणि इंग्लंड संघांमधल्या सराव सामन्यातसाठी मोठी गर्दी उसळली आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या सामन्यात भारत अ संघाचं नेतृत्त्व करतो आहे. एका आंतरराष्ट्रीय संघाविरुद्ध भारतीय संघाचा कर्णधार म्हणून धोनीचा हा अखेरचा सामना आहे. त्यामुळं या सराव सामन्याला दहा हजारांहून अधिक प्रेक्षकांनी उपस्थिती लावली आहे. ब्रेबॉर्नवर विनामूल्य प्रवेशाचा मुंबईकरांनी लाभ घेतला असून धोनीचे चाहते स्टेडियममध्ये अधूनमधून धोनी धोनी नावाचा पुकार करताना दिसतायत. एका चाहत्यानं तर थेट खेळपट्टी गाठली आणि तो धोनीच्या पायाही पडला. धोनीविषयी लोकांच्या मनातलं प्रेम या सामन्याच्या निमित्तानं दिसून येतंय.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920