anandnagri logo
मुख्य बातम्या:

4 जानेवारी,4 शतकं आणि सचिन एक अनोखा योगायोग

By आनंदनगरी वेब टीम | Thu 05-01-2017 | 01:15:20 pm

फोटो

♦ अशा अनोख्या विक्रमाची नोंद करणारा सचिन पहिलाच फलंदाज
मुंबई (वृत्तसंस्था)- क्रिकेटविश्वात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. 4 जानेवारी ही तारीख देखील सचिनच्या एका अनोख्या विक्रमामुळे नोंदवली गेली आहे. सचिनने ठोकलेल्या शंभर शतकांपैकी चार शतकं ही एकाच तारखेला ठोकली गेली आहेत. सचिनने 4 जानेवारी 1997 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊनमध्ये शतक ठोकले होते, तर 4 जानेवारी 2004 साली सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत आपले 32 वे शतक साजरे केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच  जानेवारी 2008 साली सचिनने सिडनी क्रिकेट स्टेडियमवर आपले 38 वे शतक ठोकले होते. याशिवाय, कसोटी क्रिकेटमधील आपले शेवटचे आणि 51 वे शतक देखील सचिनने 4 जानेवारी 2011 साली केले होते. वरील चारही शतकं सचिनच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरलेली आहेत. सचिनची ही चारही कसोटी शतकं आहेत. चारही कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजय नोंदविता आला नसला तरी संघ संकटात असताना सचिनने मैदानात टिच्चून फलंदाजी करत सामना अनिर्णीत राखण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्याशिवाय चारही शतके परदेशात ठोकलेली आहेत. सचिनने  जानेवारी या एकाच तारखेला ठोकलेल्या या शतकांचा योगायोग देखील एका अनोख्या विक्रमाची नोंद करणारा ठरला. एकाच तारखेला चार शतके ठोकणारा सचिन तेंडुलकर हा पहिलाच फलंदाज आहे.
►4 जानेवारी आणि सचिनची शतकं
4 जानेवारी 1997: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केप टाऊन कसोटीत सचिनची 169 धावांची खेळी.
4 जानेवारी 2004 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीत सचिनची नाबाद 241 धावांची खेळी.
4 जानेवारी 2008 : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुन्हा एकदा सिडनी स्टेडियमवर सचिनची नाबाद 154 धावांची खेळी.
 4 जानेवारी 2011 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केप टाऊनमध्ये सचिनची 146 धावांची खेळी.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920