anandnagri logo
मुख्य बातम्या:

वीरेंद्र सेहवागने दिल्या सकलेन मुश्ताकला शुभेच्छा 

By आनंदनगरी वेब टीम | Sat 31-12-2016 | 12:46:21 pm


♦ पाकिस्तानी क्रिकेट चाहते नाराज
नवी दिल्ली  (वृत्तसंस्था)- वीरेंद्र सेहवाग हा त्याच्या खास शैलीतील ट्विट्‌ससाठी ओळखला जातो. जितका तो तडाखेबाज फलंदाज आहे तितकेच खुमासदार त्याचे ट्विट्‌स असतात.वीरेंद्र सेहवागने त्याचा जुना मित्र आणि पाकिस्तानी फिरकीपटू सकलेन मुश्ताकला ट्विटकरुन शुभेच्छा दिल्या. हॅप्पी बर्थ डे सकलेन, स्टे ब्लेस्ड असे सेहवागने आधी म्हटले आणि नंतर थॅंक यू फॉर मेमरीज असे म्हणत सेहवागने एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. त्या क्लिपमध्ये वीरेंद्र सेहवाग सकलेन मुश्ताकला एक जोरदार षटकार खेचत असताना दिसत आहे. सकलेन मुश्ताकने वयाची 40 वर्षे पूर्ण केली आहे. त्याला शुभेच्छा देण्यासाठी वीरेंद्र सेहवागने मुलतानच्या डावाचा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्याने 300 धावा केल्या होत्या.
या व्हिडिओनंतर भारतीय चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानी चाहत्यांमध्ये या व्हिडिओमुळे नाराजी पसरली आहे. हे तर जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. याला वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा म्हणू शकतो असे एका चाहत्याने म्हटले आहे. जरी या चाहत्यांना शुभेच्छा आवडल्या नसल्या तरी सकलेन मुश्ताकने या शुभेच्छा स्वीकारल्या असून थॅंक्स पाजी असे उत्तर देखील दिले आहे.
गेल्या काही दिवसात सेहवाग आपल्या ट्विटसमुळे चर्चेत असतो. आपण असे ट्विट का करतो याचे रहस्य सेहवागने इंडिया टुडेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात उलगडून दाखवले होते. माझा खेळ पाहताना लोकांचे मनोरंजन व्हावे असे मला नेहमी वाटत असे त्यातूनच माझा खेळ बहरला. माझा खेळ हे माझ्या स्वभावाचाच विस्तार आहे. मी माझ्या खेळातून ज्या प्रमाणे व्यक्त होतो त्याप्रमाणेच मला माझ्या ट्विट्‌समधून व्यक्त व्हायला आवडते असे त्याने या कार्यक्रमात म्हटले होते.
प्रत्येकाचे आयुष्य हे खूप दगदगीचे आणि तणावपूर्ण झाले आहे. तेव्हा माझे ट्विट्‌स वाचून लोकांना आनंद व्हायला हवा, त्यांचे मनोरंजन व्हायला हवे असे मला वाटते त्यामुळेच मी असे ट्विट करतो असे सेहवागने म्हटले. एकदा रणवीर सिंह मला भेटला आणि तो म्हणाला मी तुमच्या ट्विट्‌सचा चाहता आहे. तुमचे ट्विट्‌स मी रात्री बेरात्री वाचतो आणि पोट दुखेपर्यंत हसतो अशी आठवण वीरेंद्र सेहवागने या कार्यक्रमादरम्यान सांगितली होती. माझ्या मुलांना देखील माझे ट्विटस् आवडतात आणि दस्तुरखुद्द सचिन तेंडुलकरने पण माझ्या ट्विटसची तारिफ केली आहे. ही माझ्यासाठी सर्वात मोठी पावती असल्याचे त्याने म्हटले होते.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920