anandnagri logo
मुख्य बातम्या:

गुजरातच्या समित गोहेलने 117 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला!

By आनंदनगरी वेब टीम | Wed 28-12-2016 | 12:23:40 pm

फोटो

जयपूर (वृत्तसंस्था)- गुजरातचा सलामीवर समित गोहेलने ओडिशाविरुद्ध सामन्यात नाबाद 359 धावांची खेळी उभारुन नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. समित गोहेल हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सलामीवीर या नात्याने सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
याआधी हा विक्रम इंग्लंडच्या सरे संघाच्या बॉबी ऍबेल यांच्या नावावर होता. बॉबी अबेल यांनी 1899 साली सॉमरसेटविरुद्ध 357 धावांची खेळी केली होती. आज समितने 117 वर्षांनंतर त्यांचा विक्रम मोडला. तसंच समित गोहेल हा रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचवा फलंदाज ठरला आहे. रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम महाराष्ट्राच्या भाऊसाहेब निंबाळकर यांच्या नावावर आहे. भाऊसाहेब निंबाळकरांनी 1948 साली नाबाद 443 धावांची खेळी रचली होती. दरम्यान, पार्थिव पटेलच्या गुजरात संघाने रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीत धडक मारण्याचा पराक्रम गाजवला. गुजरात आणि ओडिशा संघांमधला उपांत्यपूर्व सामना अनिर्णीत राहिला. पण पहिल्या डावातल्या आघाडीच्या जोरावर गुजरातने उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं.
या सामन्यात गुजरातने पहिल्या डावात 263 धावांची मजल मारली होती. तर ओडिशाचा पहिला डाव अवघ्या 199 धावांत आटोपला होता. मग समित गोहेलच्या नाबाद त्रिशतकी खेळीमुळे गुजरातने दुसऱ्या डावात 641 धावांचा डोंगर उभारुन ओडिशासमोर 706 धावांचं आव्हान दिलं होतं. ओडिशाने दुसऱ्या डावात एक बाद 81 धावांची मजल मारली.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920