anandnagri logo
मुख्य बातम्या:

अश्विन, रवींद्र जडेजा,  जयंत यादवला विश्रांती?

By आनंदनगरी वेब टीम | Wed 28-12-2016 | 12:23:34 pm

फोटो


नवी दिल्ली  (वृत्तसंस्था)- आर. अश्विन, जयंत यादव आणि रवींद्र जडेजाला विश्रांती देण्याचा निवड समितीचा विचार असल्याचे वृत्त आहे
भारत आणि इंग्लंड दरम्यान एकदिवसीय सामने आणि टी-20 सामने होणार आहेत. 15 जानेवारीपासून या सामन्यांना सुरुवात होणार आहे. या सामन्यांसाठी आर. अश्विन, जयंत यादव आणि रवींद्र जडेजाला विश्रांती देण्याचा निवड समितीचा विचार असल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यानंतर बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलिया कसोटी सामने होणार आहेत. त्या सामन्यांसाठी कुठल्याही प्रकारचा धोका बीसीसीआयला घ्यायचा नाही त्यामुळे या तिघांना विश्रांती देण्याचा विचार बीसीसीआय करत आहे.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांच्या सरावासाठी आपण हजर राहणार असल्याचे एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने बीसीसीआयला सांगितले आहे. सामने सुरू होण्याआधी दोन सराव सामने होतील. महेंद्र सिंह धोनीने दोन वर्षांपूर्वी कसोटी सामन्यातून निवृत्ती पत्करली आहे. महेंद्र सिंह धोनीने सराव सामन्यांना आपण उपस्थित राहणार आहोत असे कळवल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटले. या दोन सराव सामन्यांपैकी एक सामना दिवसा होईल तर दुसरा सामना डे-नाइट असणार आहे.
धवन आणि नायर यांची खेळण्याची शक्यता- शिखर धवनला न्यूझीलंडच्या कसोटी सामन्यादरम्यान जखम झाली होती. या सराव सामन्यादरम्यान धवनच्या फिटनेसची चाचणी घेण्यात येईल. धवनने रणजीमध्ये देखील खेळला आहे. जर सराव सामन्यात तो फिट ठरला तर तो एकदिवसीय सामन्यात खेळू शकेल.
पहिल्याच सामन्यात कसोटीमध्ये त्रिशतक झळकवणाऱ्या करुन नायर हा देखील एकदिवसीय आणि टी-20 मध्ये खेळण्याची शक्यता आहे,
मनिष पांडेला देखील सराव सामने खेळायला मिळणार आहे. निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी नवीन खेळाडूंना पूरेपूर संधी मिळे असे आश्वासन याआधीच दिले आहे. दुसऱ्या सराव सामन्यासाठी खेळण्याची अजिंक्या राहणेची इच्छा आहे. परंतु त्याच्या हाताला फ्रॅक्चर झालेले असल्यामुळे निवड समितीला हा धोका पत्करणे अयोग्य वाटत आहे.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920