anandnagri logo
मुख्य बातम्या:

आर अश्विन दुसऱ्यांदा बाबा बनला !

By आनंदनगरी वेब टीम | Wed 28-12-2016 | 12:23:27 pm

फोटो

चेन्नई (वृत्तसंस्था)- जगातील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज आणि नुकताच क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार जिंकणारा रवीचंद्रन अश्विन दुसऱ्यांदा बाबा बनला आहे. आर अश्विनची पत्नी प्रिती नारायणने तिच्या सोशल मीडिया पेजवर याबाबतची माहिती दिली. अश्विनचं हे दुसरं बाळ आहे. याआधी 2015 मध्ये तो पहिल्यांदा बाबा बनला होता. त्याला अकिरा नावाची मुलगी आहे. अश्विन आणि प्रितीच्या घरी 21 डिसेंबर रोजी छोट्या पाहुणीचं आगमन झालं. मात्र तिने पाच दिवसांनंतर ही गोड बातमी शेअर केली. आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर बनण्याची बातमी झाकोळली जाऊ नये, अशी प्रितीची इच्छा होती, त्यामुळे तिने जाणीवपूर्वक ही गोड बातमी आधी सांगितली नाही. प्रिती म्हणाली की, मी 21 डिसेंबर रोजी बाळाचा जन्म झाला. पण वरदा वादळामुळे राज्यातील व्यवहार ठप्प होते आणि चेपॉकमध्ये कसोटी जिंकल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाळाचा जन्म झाला. आम्हा अप्पाच्या (अश्विन) क्रिकेटर ऑफ द इयर बनण्याचा क्षण हिरवायचा नव्हता. त्यामुळे मी आता ही गोड बातमी सांगत आहे. आम्हाला मुलगी झाली. 2016 हे वर्ष अश्विनसाठी कमाल ठरलं. या वर्षी त्याची कामगिरी शानदार होती. 

 

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920