anandnagri logo
मुख्य बातम्या:

भारतीय क्रिकेटसाठी संस्मरणीय ठरले वर्ष 2016

By आनंदनगरी वेब टीम | Wed 28-12-2016 | 12:23:16 pm

मुंबई (वृत्तसंस्था)- यंदा टीम इंडियाने कसोटी सामन्यांत चमकदार कामगिरी करत प्रथम न्यूझीलंडला 3-0 त्यानंतर इंग्लंडला 4-0 अशा फरकाने पराभूत केले.
यंदाच्या वर्षी भारतीय क्रिकेट संघाने शानदार कामगिरीचे प्रदर्शन केले. क्रिकेटमधील प्रत्येक प्रकारात संघाने आपली छाप सोडत अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. वर्षभरात संघाने काय कामगिरी केली याची सर्वांनाच उत्सुकता आहे. जाणून घेऊयात वर्ष 2016 मधील भारतीय क्रिकेट संघाचे यश आणि खेळाडुंच्या वैयक्तिक प्रदर्शनाबाबत..
अशिया चषक: यंदाच्या वर्ष 6 मार्च रोजी मीरपूर येथे भारत आणि बांगलादेश यांच्यादरम्यान टी-20 चा अंतिम सामना झाला. यात यजमान बांगलादेशचा टीम इंडियाने 8 विकेटने पराभव करून अशिया चषकावर आपले नाव कोरले.
19 वर्षांखालील अशिया चषक: भारताच्या 19 वर्षांखालील संघाने 2016 या वर्षाचा शेवट गोड करत सलग तिसऱ्यांदा अशिया चषकावर आपले नाव कोरले. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने यजमान श्रीलंकेवर 34 धावांनी मात केली. भारताने सलग तिसऱ्यांदा हा किताब पटकावला. यापूर्वी वर्ष 2012, 2014 यावर्षी विजय मिळवला होता.
महिला अशिया चषक: गत 4 डिसेंबर रोजी बॅंकाक येथे खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात भारती महिला संघाने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 17 धावांनी पराभव करत अशिया कप आपल्या नावे केला होता. भारताने सलग सहाव्यांदा या चषकावर आपले नाव कोरले होते. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची कर्णधार मिताली राजने 73 धावांची खेळी करत पाकसमोर 122 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तानची संपूर्ण टीम 104 धावांत संपुष्टात आली होती.
19 वर्षांखालील विश्वचषक: बांगलादेशमध्ये झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात भारताने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. या मालिकेत ईशान किशन याच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या संघाने चमकदार कामगिरी केली. भारताकडून ईशान किशन, महिपाल लोमरोर आणि ऋषभ पंत यांनी सर्वांचे लक्ष वेधले. अंतिम फेरीत वेस्ट इंडिजने भारताचा 5 विकेटने पराभव केला होता. संघ प्रशिक्षक राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या युवा संघाने चांगली कामगिरी केली होती.
आयसीसी टी-20 विश्वचषक: या वर्षी 8 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत टी-20 विश्वचषक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारताने उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली. उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजने भारताचा पराभव केला. त्यानंतर झालेल्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडचा चार विकेटने पराभव करत चषक आपल्या नावे केला. या मालिकेचा हिरो टीम इंडियाचा विराट कोहली ठरला. त्याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
करूण नायरचे त्रिशतक: भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान चेन्नई येथे खेळण्यात आलेल्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटीच्या पहिल्या डावात करूण नायरने नाबाद 303 धावांची खेळी केली. करूणने आपल्या कारकीर्दीतील तिसऱ्या कसोटीतच त्रिशतक केले आहे. वीरेंद्र सेहवाग नंतर त्रिशतक करणारा करूण नायर भारताचा दुसरा खेळाडू ठरला.
इंग्लंड, न्यूझीलंडला चारली पराभवाची धूळ: यंदा टीम इंडियाने कसोटी सामन्यांत चमकदार कामगिरी करत प्रथम न्यूझीलंडला 3-0 त्यानंतर इंग्लंडला 4-0 अशा फरकाने पराभूत केले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलग 18 कसोटीत विजयी होण्याचा विक्रम बनवला आहे.
आर. अश्विन: टीम इंडियाला आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी पोहोचवण्यात रविचंद्रन अश्विन याचे मोठे योगदान आहे. अश्विनने वर्ष 2016 मध्ये 12 सामन्यात 72 गडी बाद केले. यादरम्यान 8 वेळा डावात 5 बळी आणि 3 वेळा 10 हून अधिक बळी घेण्याचा कारनामा केला आहे. अश्विन यंदा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगाने 200 बळी घेण्याचा विक्रमही आपल्या नावे केला आहे. अश्विनला त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे आयसीसीने वर्षांतील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू आणि कसोटी क्रिकेटर ऑफ द इअर हा किताब जाहीर केला.
विराट कोहली: विराट कोहलीने वर्ष 2016 मध्ये क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारतासाठी धावांचा पाऊस पाडला. एकदिवसीय आणि टी- 20 प्रमाणेच त्याने कसोटीतही विरोधी संघांचा धुव्वा उडवला. विराटने यावर्षी कसोटीमध्ये सुमारे 80 च्या सरासरीने 1215 धावा बनवल्या. याचदरम्यान त्याने 3 द्विशतके ही ठोकले. एका वर्षांत 3 द्विशतके ठोकणारा विराट कोहली भारताचा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी विराट कोहलीने प्रथमश्रेणी सामन्यात एकही द्विशतक केलेले नाही.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920