anandnagri logo
मुख्य बातम्या:

राहुलचे द्विशतक हुकले, नायरची चमकदार कामगिरी

By आनंदनगरी वेब टीम | Mon 19-12-2016 | 12:32:20 pm

फोटो


चेन्नई (वृत्तसंस्था)- कसोटीच्या तिसऱया दिवशी केएल राहुल याने आपल्या सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश करत 199 धावांची खेळी साकारून संघाला मोलाचे योगदान दिले. तर करुण नायर याने नाबाद 71 धावा केल्या आहेत. भारताच्या सलामीजोडीने आजच्या दिवसाची सुरवात देखील चांगली केली होती. पार्थिव पटेल आणि केएल राहुल यांनी शतकी भागीदारी पूर्ण करून संघाला मजबूत धावसंख्या उभारून दिली. लोकेश राहुलने जोरदार फटकेबाजी करत कसोटी कारकिर्दीतील आपले चौथे शतक पूर्ण केले, तर पार्थिव पटेल मोईन अलीच्या फिरकीवर मोठा फटका मारताना 71 धावांवर झेलबाद झाला. पार्थिव आणि लोकेशने सलामीसाठी 152 धावांची भागीदारी रचली. पटेल बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा मैदानात दाखल झाला. पण पुजारा यावेळी मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला. बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर पुजारा 19 धावांवर स्लिपमध्ये झेलबाद होऊन माघारी परतला. उपहारानंतरच्या सत्रात कोहली बाद झाल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला. स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर कव्हर्सवर फटका मारताना कोहली (15) झेलबाद झाला. कोहली बाद झाल्यानंतर भारतीय संघासाठी चिंता निर्माण झाली असताना करुण नायर याने केएल राहुल याला चांगली साथ देत चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. आजच्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी काही षटकांचा अवधी शिल्लक असताना केएल राहुल बाद झाला. केएल राहुल आपले पहिलेवहिले द्विशतक साजरे करण्यासाठी केवळ एका धावेची गरज असताना रशीदच्या बाहेर जाणाऱया चेंडूवर विकेट टाकून बसला. कव्हर्सवर केएल राहुलचा झेल टीपण्यात आला आणि राहुलचे एका धावेमुळे द्विशतक हुकल्याने सर्वच आवाक झाले.
तत्पूर्वी, कसोटीच्या पहिल्या दिवशी शतकी खेळी साकारणारा मोईन अलीने शनिवारी पहिल्या सत्रात चांगली फटकेबाजी केली होती. पण दुसऱया बाजूने बेन स्टोक्स आणि जोस बटलर हे दोन फलंदाज स्वस्तात तंबूत दाखल झाले होते. मोईन अली 146 धावांवर बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव त्वरित संपुष्टात येईल अशी अपेक्षा असताना रशीद आणि डॉसन यांनी आठव्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचून दिवसाच्या तिसऱया सत्रापर्यंत फलंदाजी केली. रशीद आणि डॉसनच्या शतकी भागीदारीमुळे इंग्लंडला साडेचारशेचा आकडा गाठता आला. रशीदने 60 तर डॉसन याने पदार्पणाच्या सामन्यात नाबाद 66 धावांची खेळी केली.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920