anandnagri logo
मुख्य बातम्या:

भारताचा "विराट' "विजय', मुंबई जिंकली आणि मालिकाही!

By आनंदनगरी वेब टीम | Tue 13-12-2016 | 12:12:29 pm

फोटो


मुंबई (वृत्तसंस्था)-कर्णधार विराट कोहलीचा द्विशतकाचा पराक्रम, सलामीवीर मुरली विजयचा शतकी धमाका, जिगरबाज जयंत यादवचं विक्रमी शतक आणि किमयागार फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं दोन्ही डावांत मिळून घेतलेल्या एक डझन विकेट, या जोरावर टीम इंडियानं इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत विराट विजय मिळवला आहे. एक डाव आणि  धावांनी इंग्लंडला धूळ चारून भारतानं पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-0 अशी निर्णायक आघाडी घेतली आहे. या मालिकाविजयामुळे भारतानं सलग पाच कसोटी मालिका जिंकण्याची किमया केली आहे.
एका वर्षात तीन कसोटी द्विशतकं झळकावणारा विराट कोहली 'मॅन ऑफ द मॅच' ठरला असून एका डावात पाच विकेट घेण्याची किमया व्यांदा करून अश्विननं कपिल देवला मागे टाकलं आहे.
पहिल्या डावात 400 धावांचा डोंगर रचणाऱ्या 'कूक कंपनी'ला दुसऱ्या डावात भारताच्या फिरकीपटूंनी 195 धावांत गुंडाळलं. जो रूट आणि जॉनी बेअरस्टो वगळता इंग्लंडचा एकही शिलेदार पीचवर फार काळ टिकू शकला नाही. किंबहुना, अश्विन, जाडेजा आणि जयंत यादव यांनी त्यांना 'सेट' होण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे पहिल्या डावातील 231 धावांची आघाडीच टीम इंडियाला विजयासाठी पुरेशी ठरली. पहिल्या डावात 400 चा टप्पा गाठूनही एका डावाने पराभूत होण्याचा बाका प्रसंग इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढवला.
भारतानं पहिल्या डावात 631धावा केल्या होत्या. हा आकडा पाहूनच बहुधा इंग्लंडची गाळण उडाली होती. म्हणूनच, दुसऱ्या डावात ते पार गडगडले. काल, चौथ्या दिवसअखेर त्यांची अवस्था 6 बाद 182 अशी होती. त्यामुळे भारताचा विजय निश्चितच होता. त्यावर, अश्विननं आज पाऊण तासात शिक्कामोर्तब केलं. काल 50 धावांवर नाबाद असलेला बेअरस्टो किती काळ तग धरणार, यावर भारताचा विजय किती लांबणार हे ठरणार होतं. परंतु, अश्विननं त्याला तिसऱ्याच ओव्हरमध्ये माघारी धाडलं. त्यानंतर, शेपटाला फक्त दहा धावांची भर घालता आली.
इंग्लंडच्या एकूण 20 विकेटपैकी 19 विकेट घेऊन भारताच्या फिरकीपटूंनी आपली ताकद पुन्हा सिद्ध केली.
कॅप्टन कोहली 'मॅन ऑफ द मॅच'- मुंबई:  इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत द्विशतक झळकावणारा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला सामनावीराच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
विराटनं 340 चेंडूंतली 235 धावांची खेळी 25 चौकार आणि एका षटकारानं सजवली. विराटचं कसोटी कारकीर्दीतलं ते तिसरं द्विशतक ठरलं.
विराट कोहलीच्या या जबरदस्त खेळीमुळं मुंबई कसोटीत भारताला इंग्लंडवर 231 धावांची आघाडी घेता आली. तसेच विराटनं जयंत यादवच्या साथीनं आठव्या विकेटसाठी 241 धावांची भागीदारीही रचली होती. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
इंग्लंडवर एक डाव 36 धावांनी मात
टीम इंडियानं इंग्लंडचा एक डाव आणि 36 धावांनी धुव्वा उडवून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. डावानं पराभव टाळण्यासाठी इंग्लंडला 231 धावांची आवश्यकता होती. पण इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 195 धावांतच आटोपला.
भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विननं दुसऱ्या डावात सहा विकेट्‌स काढल्या आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
एकाच कसोटीत 1 डझन विकेट, अश्विनचा पराक्रम
रविचंद्रन अश्विननं मुंबई कसोटीच्या दोन्ही डावांत मिळून 12 विकेट्‌स काढण्याचा पराक्रम गाजवला.
अश्विननं कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात पाच विकेट्‌स काढण्याची कामगिरी बजावण्याची ही 24 वी वेळ ठरली. तर एकाच कसोटीत 10 किंवा दहापेक्षा अधिक विकेट्‌स काढण्याचा पराक्रम गाजवण्याची अश्विनची ही सातवी वेळ आहे.
केवळ अनिल कुंबळेनंच अश्विनपेक्षा जास्तवेळा म्हणजे आठवेळा एकाच कसोटीत दहा किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्‌स काढल्या होत्या.
अश्विननं इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेतील चार कसोटींमध्ये मिळून आतापर्यंत 27 विकेट्‌स काढल्या आहेत. एकाच कसोटी मालिकेत 25 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्‌स काढण्याची अश्विनची ही चौथी वेळ असून, त्यानं याबाबतीत कपिलदेवच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.
विक्रमासोबतच विराटने धोनीलाही मागे टाकलं!- टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि 9 व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या जयंत यादव यांच्या द्विशतकी भागीदारीने भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.
 विराटने द्विशतकासोबतच अनेक विक्रम नोंदवले आहेत. त्याने धोनीलाही मागे टाकलं आहे.
विराटने 235 धावांच्या द्विशतकी खेळीसह कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही रचला आहे.माजी कसोटी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2013 साली चेन्नईत केलेल्या 224 धावांचा विक्रमही विराटने मोडीत काढला आहे.
 याशिवाय एकाच वर्षात सगल तीन कसोटी मालिकांमध्ये द्विशतक ठोकणारा विराट पहिलाच फलंदाज आहे.
 सर डॉन ब्रॅडमन यांनी 1930 ते 1932 या काळात तीन कसोटी मालिकांमध्ये सहा द्विशतक ठोकले होते. तर द्रविडने 2003 ते 2004 या काळात सलग तीन कसोटी मालिकांमध्ये द्विशतक ठोकले होते.

 

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920