anandnagri logo
मुख्य बातम्या:

विराट कोहीचा डबल धमाका

By आनंदनगरी वेब टीम | Mon 12-12-2016 | 12:20:36 pm

♦ मुंबई कसोटीत विजयचा शतकी धमाका
मुंबई  (वृत्तसंस्था)- मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर सुरु असलेल्या भारत-इंग्लड दरम्यानच्या कसोटी सामन्यात कॅप्टन विराट कोहलीनं द्विशतकी खेळी रचली आहे. कोहलीच्या या द्विशतकी खेळीमुळे टीम इंडिया मजबूत स्थितीत पोहोचली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात टीम इंडियानं 7 बाद 558 धावांचा डोंगर रचला आहे. कॅप्टन कोहलीसोबत मैदानात असलेल्या जयंत यादवनेही सुंदर भागिदारी केली आहे. विराट कोहलीचं गेल्या तीन महिन्यांमधील हे सलग तिसरं द्विशतक आहे. मैदानात उतरल्यावर विराटनं कालही अशीच दमदार खेळी केली होती. त्यामुळे कालपासून क्रीडा समिक्षकांनी विराटचं तोंडभरुन कौतुकही केलं होतं.
कर्णधारपदी असलेल्या विराटनं आश्वासक आणि जबाबदार खेळी केल्यानं क्रिकेट चाहते आणि समीक्षकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे.
या कसोटीत सलामीवीर मुरली विजयनंही 136 धावांची खेळी केली होती. त्यामुळं टीम इंडिया 400 धावांचा पल्ला सहज पार करेल असं वाटत होतं. मात्र, जो रूट आणि आदिल रशीदच्या फिरकीसमोर भारताच्या मधल्या फळीची काहीशी पडझड झाली. सध्या विराटनं 200 धावांचा पल्ला ओलांडला असून जयंत यादव त्याच्या साथीला आहे.
मुंबई कसोटीत 
► विजयचा शतकी धमाका
टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीनं वानखेडे स्टेडियमवर कसोटी क्रिकेटमधलं आपलं पंधरावं शतक साजरं केलं आणि भारताचा डाव सावरला.
सलामीवीर मुरली विजयनंही 136 धावांची खेळी केली होती. त्यामुळं टीम इंडिया 400 धावांचा पल्ला सहज पार करेल असं वाटत होतं. मात्र, जो रूट आणि आदिल रशीदच्या फिरकीसमोर भारताच्या मधल्या फळीची काहीशी पडझड झाली. सध्या विराट 104 धावांवर खेळत असून जयंत यादव त्याच्या साथीला आहे.
मुरली विजयचं शतक आणि विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतानं मुंबई कसोटीत इंग्लंडला अगदी चोख प्रत्युत्तर दिलं. विजयनं या वानखेडेवर 282 चेंडूंमध्ये दहा चौकार आणि तीन षटकारांसह 136 धावांची खेळी केली आणि मालिकेतलं आपलं दुसरं शतक साजरं केलं. तर काल 47 धावा फटकावणारा चेतेश्वर पुजारा आज दिवसाच्या पहिल्याच षटकात बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीनं मैदानावर पाय रोवून फलंदाजी केली. भारतानं आतापर्यंत 6 गडी गमावून 348 धावा केल्या आहेत. टीम इंडिया इग्लंडपेक्षा अजून 52 धावांनी पिछाडीवर आहे. भारत-इंग्लडमधील मुंबई कसोटीच्या तिसऱ्या दिवशी सलामीवीर मुरली विजयनं शानदार शतकं झळकावलं. कसोटी कारकिर्दीतील हे त्याचं 8वं शतक आहे. तर कर्णधार विराट कोहलीही अर्धशतकाच्या जवळ पोहचला आहे.
लंचपर्यंत भारतानं 2 गडी गमावून 247 धावा केल्या आहेत. भारत अजूनही 153 धावांनी मागे आहे. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतानं 31 षटकात एक गडी गमावून 101 धावा केल्या आहेत.
आज सकाळी सुरुवातीला चेतेश्वर पुजारा 47 धावांवर बाद झाला.  त्यानंतर आलेल्या विराटनं संयमी फलंदाजी केली. दरम्यान, विराटनं कसोटीत 4000 धावांचा टप्पाही पार केला.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920