anandnagri logo
मुख्य बातम्या:

भारतीय क्रिकेट मंडळाला सचिन तेंडुलकरचे समर्थन

By आनंदनगरी वेब टीम | Mon 05-12-2016 | 12:08:14 pm

फोटो


मुंबई  (वृत्तसंस्था)- लोढा समितीच्या शिफारशींविरुद्ध बीसीसीआयच्या लढाईला पाठबळ देण्यासाठी माजी क्रिकेटपटूंनी हळूहळू तोंड उघडायला सुरुवात केली असून आपल्या पालक संस्थेच्या समर्थनार्थ आता सचिन तेंडुलकरही पुढे सरसावला आहे. बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत दिल्लीत झालेल्या एका परिसंवादात सचिनने बीसीसीआयच्या उत्तम कार्याची तोंडभरून स्तुती केली. लोढा समितीच्या महत्त्वाच्या सूचनेवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित असल्यामुळे त्यावर भाष्य करणे शहाणपणाचे ठरणार नाही, असेही सचिनने स्पष्ट केले. मात्र बीसीसीआयच्या समर्थनार्थ त्याने अनेक मुद्दे मांडले. तो म्हणाला, बीसीसीआयने देशातील क्रिकेट या खेळाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी आणि प्रतिमेसाठी खूप काही केले आहे. मी किशोरावस्थेत असताना, माझे क्रिकेट आकाराला येत असताना बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या प्रशिक्षण शिबिरांचाच मला अधिकाधिक फायदा झाला. बीसीसीआयने देशातील उदयोन्मुख खेळाडूंना खूप पाठिंबा दिला आहे. त्यांचे क्रिकेट प्रशिक्षण, दौरे, मालिका, उत्तम प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण देणे आदी गोष्टींद्वारे खेळाडूंना नेहमी मदतच केली आहे.
सचिन म्हणाला, 14 जणांच्या संपूर्ण चमूला सामन्यात खेळवण्याची कल्पना मी मुंबई क्रिकेट संघटनेपुढे मांडली होती. त्यांनी ती मान्य केली. त्यामुळे शालेय स्तरावरील 1800 क्रिकेटपटूंनाही खेळण्याची संधी मिळाली, नाही तर ते राखीव खेळाडू म्हणून प्रत्यक्ष सामन्यात सहभागी होऊ शकले नसते. या वेळी त्याने कोहली ब्रिगेडचही स्तुती केली.
रणजीत दोन खेळपट्‌ट्या, दोन चेंडू असावेत
1) रणजी स्पर्धेच्या सामन्यांसाठी दोन खेळपट्‌ट्या आजूबाजूला तयार कराव्यात. एका खेळपट्टीवर गवत ठेवून त्यावर पहिले दोन डाव खेळवावेत. दुसरी शेजारची खेळपट्टी फिरकीचा आखाडा करावी. त्यावर शेवटचे दोन डाव खेळवावेत. दोन्ही संघांचा पहिला डाव एका खेळपट्टीवर, तर दुसरा डाव दुसऱ्या खेळपट्टीवर खेळवला जावा.
2) यामुळे नाणेफेकीचा एकाच संघाला होणारा लाभ कमी होईल. प्रथम गोलंदाजी (ग्रीन खेळपट्टीवर) करणाऱ्या संघाला शेवटचा डाव फिरकीच्या आखाड्यात खेळावा लागणार आहे. त्यामुळे आधीचा फायदा नंतर तोटाही ठरू शकतो. यामुळे ज्या खेळाडूत खरोखर दम आहे, तो टिकेल आणि दमदार खेळ करेल. यातून चांगले खेळाडू घडतील.
3)ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिकेत कुकाबुरा चेंडूने खेळतात, जो सुरुवातीला पुष्कळ स्विंग होतो. आपल्या फलंदाजांना ड्युक्स चेंडूने खेळायची सवय आहे. त्यामुळे कुकाबुरा चेंडूने खेळताना त्यांची कुचंबणा होते. या दोन्ही चेंडूंनी दोन-दोन डाव खेळ खेळल्यास दोन्ही चेंडूंवर खेळण्याचा सराव भारतीय फलंदाजांना होईल.
भारतीय क्रिकेटपटूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर व प्रामुख्याने परदेशात होणारी कुचंबणा पाहून लिटल मास्टर सचिन तेंडुलकर याने रणजी स्पर्धेत प्रायोगिक स्वरूपात राबवण्यासाठी सूचना केल्या आहेत.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920