anandnagri logo
मुख्य बातम्या:

भारताच्या 405 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड 2 बाद 87

By आनंदनगरी वेब टीम | Mon 21-11-2016 | 12:59:30 pm

फोटो


♦ अलिस्टर कूक 54 धावांवर बाद, भारताला विजयासाठी 8 विकेट्‌सची गरज
विशाखापट्टणम (वृत्तसंस्था)- येथील कसोटीत भारतीय संघाने आपल्या दुसऱया डावानंतर इंग्लंडला दिलेल्या 405 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचे दोन फलंदाज माघारी परतले आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडची धावसंख्या 2 बाद 87 अशी आहे. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी उद्याच्या दिवसात 318 धावा कराव्या लागणार आहेत. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सलामी जोडी अलिस्टर कूक आणि हमीद यांनी संथ सुरूवात केली होती. दोघांनी मैदानात जम बसवून अर्धशतकी भागीदारी रचल्याने भारतीय गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले होते. अखेर 51 व्या षटकात अश्विनने भारताला पहिले यश मिळवून दिले. अश्विनच्या फिरकीवर हमीद पायचीत होऊन माघारी परतला. हमीदने तब्बल 144 चेंडू खेळून काढले आणि यात त्याने केवळ 25 धावा केल्या. यानंतर आजच्या दिवसाच्या अखेरच्या षटकात रवींद्र जडेजाने भारताला दुसरे यश मिळवून दिले. जडेजाने कर्णधार अलिस्टर कूक यांना 54 धावांवर पायचीत केले.
भारतीय संघाकडे सामना जिंकण्यासाठी उद्याचा संपूर्ण दिवस असून उद्याच्या दिवसात भारतीय गोलंदाजांना आठ विकेट्‌स घेण्याची गरज आहे.  त्यामुळे भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीकडे उद्या सर्वांचे लक्ष असेल. तत्पूर्वी, पहिल्या डावात  धावांची आघाडी मिळवलेल्या भारतीय संघाचा दुसरा डाव सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात 204 धावांमध्ये संपुष्टात आला. आज पहिल्या दिवसात इंग्लंडच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत तब्बल 7 विकेट्‌स मिळवल्या. भारताचे आव्हान गाठण्यासाठी आजचा अर्धा आणि उद्याचा संपूर्ण दिवस हातात आहे. भारतीय संघाचा विजय हा आता संघाच्या गोलंदाजीवर पूर्णपणे अवलंबून आहे. भारतीय गोलंदाज इंग्लंडला चारशे धावांच्या आत रोखणार का? याची उत्सुकता सर्वांना आहे.
दिवसाच्या सुरूवातीला कोहली आणि रहाणे यांनी काही षटके खेळून काढत संयमी सुरूवात केली होती. त्यानंतर कोहलीने आपला फॉर्म कायम ठेवत चौकारांची बरसात करण्यास सुरूवात केली, पण रहाणेकडून साजेशी साथ मिळणे अपेक्षित असताना त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर विकेट टाकली. रहाणे  धावांवर स्लिपमध्ये झेलबाद होऊन माघारी परतला. रहाणे बाद झाल्यानंतर अश्विन आणि वृद्धीमान साहा देखील काही खास कामगिरी करु शकले नाहीत. अश्विन 7 धावांवर तर वृद्धीमान साहा अवघ्या दोन धावा करून माघारी परतला. अखेर कोहली देखील एकहाती खिंड लढवताना 81 धावांवर रशीदच्या फिरकीवर स्लिपमध्ये झेलबाद झाला. कोहली बाद झाला तेव्हा भारतीय संघाने इंग्लंडवर 350 हून अधिक धावांची आघाडी घेतली होती. जडेजा देखील डीप मिड विकेटवर मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला, तर उमेश यादवला देखील रशीदने स्वस्तात चालते केले. अखेरीस मोहम्मद शमीने रशीदच्या फिरकीवर जोरदार फटकेबाजी करत संघाला चारशे धावांची आघाडी मिळवून दिली. शमी आणि जयंत यादव जोडी घातक ठरत असल्याचे दिसत असताना इंग्लंडकडून गोलंदाजीत बदल करण्यात आला. मोईन अलीने आपल्या पिहल्याच चेंडूवर मोहम्मद शमीची विकेट घेतली. यष्टीरक्षक बेअरस्टोने शमीला स्टम्पिंग केले आणि भारताचा डाव  धावांत संपला. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉड आणि रशीद यांनी प्रत्येकी चार विकेट्‌स घेतल्या.
तिसऱया दिवसाच्या अखेरीस भारताने 298 धावांची आघाडी मिळवली होती. तिसऱया दिवसाच्या खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या 3 बाद 98 अशी  होती. विराट कोहली 55 धावांवर, तर रहाणे 19 धावांवर नाबाद राहिला होता. त्यानंतर आज कोहलीने इंग्लंडच्या गोलंदाजांना पुनरागमनाची कोणतीही संधी न देता आपली फटकेबाजी सुरूच ठेवली. कोहली इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड आणि अँडरसन यांचा चांगला समाचार घेत आहे. कसोटीच्या तिसऱया दिवशी फिरकीपटू अश्विनच्या फिरकीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली. तिसऱया दिवसाच्या दुसऱया सत्रात भारताने इंग्लंडचा पहिला डाव  धावांत गुंडाळला. त्यामुळे भारतीय संघाला  धावांची भक्कम आघाडी घेता आली. आर.अश्विनने इंग्लंडच्या पाच खेळाडूंना आपल्या फिरकी जाळ्यात ओढले. शमी, जडेजा, उमेश यादव, जयंत यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920