anandnagri logo
मुख्य बातम्या:

बाबरीप्रकरणाचा  22 मार्चला निकाल

By आनंदनगरी वेब टीम | Tue 07-03-2017 | 11:44:32 am

नवीदिल्ली (वृत्तसंस्था)-उत्तर प्रदेशमधील बहुचर्चित बाबरी मशीद पतनाप्रकरणी सर्वोच्च न्यायालय 22 मार्चला अंतिम निकाल सुनावणार आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश पी. सी. घोष आणि न्यायाधीश आर. एफ. नरीमन यांनी सीबीआय आणि हाजी महबूब अहमद यांच्या याचिकेवर सुनावणी करताना 22 मार्चला अंतिम निकाल देणार असल्याचे सांगितले आहे. या याचिकेच्या माध्यमातून अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते.अलाहाबाद उच्च न्यायालयाने बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी निकाल देताना भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री उमा भारती, राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह, ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्यासह अन्य लोकांना दोषमुक्त ठरवले होते. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय बदलल्यास या सर्व नेत्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. याआधी न्यायालयाने मार्च 2015 मध्ये सर्व आरोपींची साक्ष नोंदवली होती.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920