anandnagri logo
मुख्य बातम्या:

संपत्तीचे प्रदर्शन नको आणि स्थानिकांबरोबर मिसळून राहा

By आनंदनगरी वेब टीम | Fri 03-03-2017 | 12:44:58 pm

फोटो


♦ अमेरिकेतील भारतीय तरुणांना निर्देश; तेलगु संघटनेचा पुढाकार
नवीदिल्ली (वृत्तसंस्था)- अमेरिकेतील वर्णद्वेषी हल्ल्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर येथील तेलगू संघटनांकडून भारतीय तरूणांसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत. आर्थिक भरभराटीमुळे येथील भारतीयांना स्थानिक लोकांच्या रोषाला बळी न पडता सुरक्षित राहण्याच्यादृष्टीने या सूचनांचे पालन करावे, असे या संघटनेने सांगितले आहे. गेल्या आठवड्यात कन्सास येथे श्रीनिवास कुचिभोतला या भारतीय तरुणाची वर्णद्वेषातून हत्या झाल्यानंतर अमेरिकेतील भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर 27 फेब्रुवारीला तेलंगणा अमेरिकन तेलगू असोसिएशनने (टाटा) एक बैठक आयोजित केली होती. यावेळी तेलगू तरूणांना सुरक्षेच्यादृष्टीने काही निर्देश देण्यात आले. तेलगू तरूणांनी स्थानिकांसोबत मिसळून राहावे. जेणेकरून अमेरिकन लोकांना आपली संस्कृती कळेल, असे या बैठकीत सांगण्यात आले. स्थानिक लोकांपासून अलिप्त राहणे, हे संशयाला वाव देणारे आहे. त्यामुळे भारतीय लोकांना आपल्याच लोकांबरोबर राहण्याची मनोवृत्ती बदलायला हवी, असे टाटाचे अध्यक्ष झांसी रेड्डी यांनी सांगितले.
कन्सासमध्ये श्रीनिवास कुचिभोतला आणि अशोक मदासनी या दोन भारतीय तरुणांवर नौदलातील माजी अधिकाऱ्याने गोळीबार केला होता. यात श्रीनिवासचा मृत्यू झाला होता. तर अशोक मदासनी हा गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर आता अमेरिकेतील भारतीयांनी सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.  अमेरिकेत राहणा-या तेलगू भाषिकांनी सार्वजनिक ठिकाणी तेलगू भाषेत संवाद साधणे टाळावे. याऐवजी इंग्रजी भाषेत संवाद साधावा असे संघटनेने म्हटले आहे. तसेच कोणीशीही वाद घालू नये. कोणासोबत वाद झाल्यास काही न बोलता तातडीने तिथून निघून जावे असे संघटनेच्या फेसबुक पेजवर म्हटले आहे. निर्जनस्थळी हल्ला होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा ठिकाणी जाणे टाळावे तसेच एकट्याने फिरणेही टाळावे असे आवाहन संघटनेने केले आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी कॉंग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात बोलताना श्रीनिवास कुचिभोतला याच्या हत्येचा निषेध केला होता. नवीन स्थलांतर नियम हे केवळ देश सुरक्षित ठेवण्यासाठी आहेत असे ते म्हणाले. आम्ही अशा हीन स्वरूपाच्या कृत्यांचा निषेध करतो असे सांगत त्यांनी ज्यू केंद्रांना दिल्या जाणाऱ्या धमक्या व कन्सास गोळीबार घटनेचा उल्लेख केला. जानेवारीत अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचे संयुक्त अधिवेशनात हे पहिलेच भाषण होते. 
कन्सास घटनेचा अध्यक्षांनी निषेध न केल्यामुळे देशाचे मोठे नुकसान होईल व चुकीचा संदेश जाईल अशी टीका दी न्यूयॉर्क टाइम्सने अग्रलेखात केली होती.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920