anandnagri logo
मुख्य बातम्या:

हिंगोलीचा दसरा  महोत्सव

By आनंदनगरी वेब टीम | Sat 08-10-2016 | 10:29:42 pm

हिंगोलीचा दसरा  महोत्सव
सुमारे दीडशे वर्षांची परंपरा लाभलेला मराठवाड्यातील हिंगोली येथील दसरा महोत्सव देशवासियांसाठी आकर्षण ठरला आहे. यंदा हा महोत्सव दि. 1 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत साजरा होत आहे. 150 वर्षांची परंपरा लाभलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्याचा इतिहास या लेखातून मांडण्यात आला आहे.दसरा किंवा विजयादशमी म्हणजे सत्प्रवृत्तीने असत्यावर व सद्गुणांनी दुर्गुणांवर मिळवलेला विजय होय. पौराणिक संदर्भानुसार श्रीरामाने रावणावर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी प्राचीन काळापासून देशभरात विजयादशमी उत्साहाने साजरी केली जाते. कर्नाटकात म्हैसूर येथे वाडियार या राजघराण्याने सुरु केलेला दसरा महोत्सव देशातच नाहीतर जगभरात प्रसिद्ध आहे. जवळ-जवळ तितकीच प्रदीर्घ परंपरा हिंगोलीच्या सार्वजनिक दसरा महोत्सवाला लाभली आहे.150 वर्षांची परंपरा लाभलेल्या हिंगोली व म्हैसूरच्या दसरा महोत्सवातील मुख्य फरक म्हणजे म्हैसूरच्या दसऱ्याला राजाश्रय लाभला तर हिंगोलीच्या दसऱ्याला लोकाश्रय लाभलेला आहे. हा लोकाश्रय इतका उदार आहे की, म्हैसूरच्या दसरा महोत्सवानंतर क्रमांक दोनचा दसरा म्हणून हिंगोलीच्या दसऱ्याची देशपातळीवर दखल घेतली जाते.उत्तरेतून हिंगोलीत आलेली ब्रिटिश छावणीत वास्तव्य करणारी मंडळी ही सैनिकी पेशाची असल्याने त्यांच्या पेशाच्या परंपरेनुसार ती दसऱ्याच्या दिवशी त्यांच्या शस्त्रास्त्रांची पूजा करीत असत. फार पूर्वी कयाधू नदीच्या काठावरील खाकीबाबा मठ हा आखाडा परंपरेतील असल्याने तेथेही शस्त्रास्त्रे असत. तसेच त्या परिसरात राम मंदिर असल्याने दसऱ्याच्या दिवशीही ही मंडळी खाकीबाबा मठात जाऊ लागली. त्यातूनच मठाच्या आवारात रावण दहनाची परंपरा दसऱ्याच्या दिवशी सुरु झाल्याचे शहरातील जुनी-जाणती मंडळी सांगतात. नंतर ही पंरपरा हिंगोलीकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली. या उत्सवाची व्याप्ती वाढू लागताच मठाची जागा अपुरी पडू लागल्याने शहराच्या मध्यभागी असलेल्या सध्याच्या रामलीला मैदानावर या महोत्सवाचे भव्य प्रमाणात आयोजन होऊ लागले. आता हा महोत्सव हिंगोलीतील समस्त जाती-धर्मांच्या लोकांच्या सार्वजनिक जीवनाचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला आहे.सन 1855 पासून म्हणजे 150 वर्षांहून जास्त परंपरा लाभलेल्या या महोत्सवाचे समस्त हिंगोलीवासियांनी अभिमानाने जतन केले आहे. भाद्रपद पौर्णिमेला बासा पूजनाने या कार्यक्रमाद्वारे सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या तयारीला सुरुवात होते. घटस्थापना ते रामराज्याभिषेक या कालावधीत साजरा होणारा हा महोत्सव म्हणजे हिंगोलीकरांच्या एकात्मतेचे उत्कृष्ट उदाहरण होय.या महोत्सवाच्या निमित्ताने विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. अलिकडच्या काळात कराटे, टेबल-टेनिस, बॅडमिंटन, कब्बडी, कुस्ती, बुद्धीबळ आदी क्रीडा प्रकारांचेही आयोजन केले जाते. 1970 पासून या महोत्सवानिमित्त प्रदर्शनाच्या आयोजनाला सुरुवात झाली. 
 

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920