anandnagri logo
मुख्य बातम्या:

जालन्यातील एका जंगलात केली व्यापारी युवकाने गळफास घेऊन आत्महत्या 

By आनंदनगरी वेब टीम | Sat 12-09-2020 | 11:42:35 am

फोटो

जालना- शहरालगत असलेल्या एसआरपीएफ जवळील जंगलात रात्री एका युवा व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मिसींग दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासात सदर बाजार पोलीस घटनास्थळी पोहोचले होते, परंतु तोवर या युवकाने गळफास घेऊन स्वत:चे जीवन संपवीले.  तुषार अग्रवाल यांची रात्री मिसींग तक्रार दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण यांनी तपासाची चक्रे फिरवून तुषार अग्रवाल यांचा शोध घेतला असता, त्यांचे मोबाईल लोकेशन एसआरपीएफ जवळील जंगलांमध्ये आढळून आले. त्यामुळे पोउपनि चव्हाण हे  त्यांच्या पथकासह जंगलात दाखल झाले व तुषार अग्रवाल यांचा शोध घेतला. 

त्यांच्या मोबाईल लोकेशनवर पोलीस गेले असता तुषार अग्रवाल यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल परशुराम पवार यांनी मिसिंग दाखल होताच सदर माहिती पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना देऊन तुषार अग्रवाल यांच्या नातेवाईकांना याबाबत माहिती देण्यात आली. आर्थिक व्यवहारातून आलेल्या तणावातून तुषार अग्रवाल यांनी आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती सुत्रांनी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920