anandnagri logo
मुख्य बातम्या:

कोरोना रुग्णाचे पैसे मिळतात ही केवळ अफवा ; जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा लॉकडाऊन नाही - जिल्हाधिकारी 

By आनंदनगरी वेब टीम | Thu 10-09-2020 | 01:45:40 pm

फोटो

जालना(प्रतिनिधी)  – एक कोरोना रुग्ण शोधला म्हणजे शासनाकडून त्या पालिका, महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेला दीड लाख रुपये मिळतात.  त्यामुळे सध्या भरमसाठ रुग्ण शोधले जात असल्याबाबत सोशल मिडियावर संदेश फिरत आहे. मात्र प्रत्यक्षात अशा प्रकारे कुठलेही पैसे कुठल्याच स्थानिक स्वराज्य संस्थेला मिळत नाहीत.  हा संदेश केवळ एक अफवा आहे. तसेच जालना जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा लॉकडाऊन होणार नसुन ती सुद्धा एक अफवाच असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी स्पष्ट केले आहे. 
          या संदर्भात अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी  बिनवडे म्हणाले, कोरोना रुग्णापोटी ग्रामपंचायत, नगर पालिका अथवा कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला किंवा रुग्ण शोधला म्हणुन कुठल्याही अधिकाऱ्यांना पैसे मिळत नसतात.  शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत संबंधित सभासद पात्र ठरत असल्यास तो थेट एखाद्या रुग्णालयात जाऊन उपचार घेतो.  त्या योजनेचा लाभ घेतलेल्या रुग्णाच्या उपचाराचे पैसे थेट त्या रुग्णालयाला मिळतात. त्याच्याशी कुठल्याच स्थानिक स्वराज्य संस्थेचा संबंध येत नाही. महात्मा ज्योतिबा फुले जआरोग्य योजनेचा कोरोनाच्या रुग्ण शोधण्याशी संबंधित विषय नाही.  या योजनेविषयी इंटरनेटवरसविस्तर माहिती उपलब्ध आहे. हा संदेश केवळ एक अफवाच आहे. कोणीही यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी  बिनवडे यांनी केले.
      जालना जिल्ह्यात १० दिवसांचा लॉकडाऊन होणार असल्याची अफवाही सोशल मिडियावरुन प्रसारित होत आहे.  जालना जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा लॉकडाऊन होणार नसुन नागरिकांनी अशा प्रकारच्या अफवांना बळी न पडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920