anandnagri logo
मुख्य बातम्या:

जालन्यात फौजदाराची गोळी झाडून आत्महत्या

By आनंदनगरी वेब टीम | Tue 08-09-2020 | 01:36:31 pm

फोटो

जालना (प्रतिनिधी) - जालना पोलीस मुख्यालयातील एका सहायक फौजदाराने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली आहे. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.

पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले सहायक फौजदार सुभाष गायकवाड हे आज सकाळी ८.४५ वा. दरम्यान स्कॉटिंग करून पिस्तूल जमा करण्यासाठी मुख्यालयाच्या शस्त्रागार विभागात गेले होते. यावेळी, शस्त्रागार विभागाच्या पाठीमागे जाऊन त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. त्यातच ते गतप्राण झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

घटनेची माहिती कळताच पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) अभय देशमुख, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, संजय लोहकरे, यशवंत जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920