anandnagri logo
मुख्य बातम्या:

जालन्यात तरुणीवर सामुहिक अत्याचार

By आनंदनगरी वेब टीम | Thu 27-08-2020 | 12:56:32 pm

जालना (प्रतिनिधी)- येथील रोजुर रोडवरील एका शेतात एका तरुणीवर दोघांनी मिळून सामुहिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी (ता.26) सायंकाळी साडे चार वाजता घडली आहे. या घटनेस पोलीस सुत्रांनी दुजोरा दिला असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगीतले. 

नवीन मोंढा परिसरातील एक तरुणी ही राजुर रोडवरील एका शेतात गत दोन दिवसापासून मजुरीने कामावर जात होती. तिथे असलेल्या सालगड्याने व शेतमालकाच्या ड्रायव्हरने तीच्याशी सलगी करुन आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास तिच्यावर बलात्कार केला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या दहा वर्षीय बालिकेसही आरोपींनी मारहाण केली असल्याचे सुत्रांनी सांगीतले. घटनेनंतर पिडीतेस जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असुन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.  चंदनझिरा पोलीस ठाण्यास पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अतिरीक्त पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख राजेंद्रसिंह गौर यांनी भेट दिली असुन या प्रकरणी काही लोकांची रात्री उशिरा पर्यंत सुरु होती.

पोलीस अधीक्षकांनी दिला दुजोरा

या प्रकरणी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांना विचारले असता त्यांनी चंदनझिरा पोलीस ठाणे हद्दीत एका वीस वर्षीय तरुणीवर दोघांनी अत्याचार केला केल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. तसेच या प्रकरणात दोन संशयीतांना ताब्यात घेतले असल्याचे सांगीतले.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920