anandnagri logo
मुख्य बातम्या:

जालन्यात महिलेचा प्राॅपर्टीच्या वादातून निर्घृण खून

By आनंदनगरी वेब टीम | Mon 10-08-2020 | 11:56:36 am

फोटो

जालना (प्रतिनिधी )-प्राॅपर्टीच्या वादातून येथील एका तीस वर्षीय विवाहीतेचा निर्घृण खून केल्याची घटना रात्री उशिरा घडली आहे. याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी महिलेसह इतर दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर बाजार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काझीपुरा येथील हिना माजीद खान (वय 30) ही विवाहीता पतीसह घरात असताना रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तिच्या पहिल्या पतीच्या नातेवाईकांनी घराचा दरवाजा तोडून हल्ला चढवला. 

यात इंजेक्शनच्या सुया, लोखंडी राॅड व चाकुद्वारे हिना खान वर वार करुन तीला ठार करण्यात आले. तर सोबत असलेला तिचा पती हा ही या हल्ल्यात जखमी झाला असुन त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.हिनाचा पती सय्यद माजीद सय्यद कय्युम याने सदर बाजार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, एका महिलेसह इतर अकरा जणांवर भांदवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सपोनि शिवाजी नागवे करीत आहेत.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920