anandnagri logo
मुख्य बातम्या:

कोरोना: दहा रुग्णांच्या वाढीनंतर जालना जिल्हा 71 वर 

By आनंदनगरी वेब टीम | Mon 25-05-2020 | 11:28:42 am

फोटो

जालना (प्रतिनिधी)- जगभरात थैमान घालणारा कोरोना संसर्ग आता जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पाय पसरत असुन अंबड, घनसावंगी, मंठा, परतुर व भोकरदन तालुक्यांतील काही गावात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यातच आज आणखी नवीन दहा रूग्णांची भर पडली असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 71 वर पोहचली असल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली आहे. 

जालना जिल्हा रुग्णालयातर्फे शनिवारी एकूण 106 संशयीत रुग्णांच्या लाळेचे नमुने घेऊन ते काल रविवारी सकाळी प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 105 अहवाल काल रविवारी रात्री उशिरा प्राप्त झाले आहेत. त्यात जालना शहरातील जुना जालना भागातील नामांकित असलेल्या एका खाजगी रुग्णालयाशी संबंधित पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच जालना तालुक्यातील पिरपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत असलेल्या नूतनवाडी येथील 2, अंबड तालुक्यातील 1,मंठा तालुक्यातील हनुमंतखेडा आणि कानडी येथील प्रत्येकी एक अशा एकूण दहा रुग्णांचा समावेश असून त्यात सहा महिला व चार पुरुषांचा समावेश असल्याचे समजते.

जिल्हा प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात असुन केवळ नागरिकांचे दुर्लक्ष व बेजबाबदारपणामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सुरक्षित राहायचे असेल तर घराबाहेर निघणे टाळले पाहिजे असे तज्ञांचे मत आहे.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920