anandnagri logo
मुख्य बातम्या:

जालन्यात सामुहिक संसर्गाचा धोका? 

By आनंदनगरी वेब टीम | Wed 20-05-2020 | 12:19:25 pm

फोटो

एकाच रुग्णालयातील आठ व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याने वाढली जालनेकरांची चिंता

 

जालना (प्रतिनिधी)- जिल्हा प्रशासनाने शक्य ती खबरदारी घेतल्यानंतरही एका खाजगी दवाखान्यातील डाॅक्टरपासुन त्याच्या संपर्कातील इतर सात व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने जालना शहरात सामुहिक संसर्गाचा धोका वाढला आहे. सुरुवातीला तेथील एक डाॅक्टर कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर त्याच्या संपर्कातील तेथील प्रशासकिय अधिकारी देखील कोरोना बाधित आढळून आला होता. त्यानंतर फार्मासिस्टसह इतर एक व मंगळवारी रात्री उशिरा अजून चार कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्याने जालन्यात एकच खळबळ उडाली आहे. 

मंगळवारी (ता.19) रात्री उशिरा औरंगाबाद येथील प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार जालना शहरातील त्या रुग्णालयात काम करणारे चार कर्मचारी व अंबड तालुक्यांतील पारनेर येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्यानंतर आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 41 वर पोहोचली आहे. मंगळवारी दुपारी नुतनवाडी येथील कोरोना बाधीत बालकाच्या संपर्कातील वृद्धेसह इतर 66 जणांचे स्वॅब तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी काही जणांचा अहवाल मंगळवारी रात्री उशिरा जिल्हा सामान्य रुग्णालयास प्राप्त झाला आहे. 

आतापर्यंत जालना जिल्हा सामान्य रुग्णालयातून उपचार घेऊन सात कोरोना रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर सुदैवाने आतापर्यंत जालना जिल्ह्यात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे आरोग्य विभाग व डाॅक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याने डाॅक्टरांचेही कौतुक होत आहे.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920