anandnagri logo
मुख्य बातम्या:

कोरोना संशयीत रुग्णासोबत पोलीसही ताटकळले

By आनंदनगरी वेब टीम | Tue 19-05-2020 | 07:55:53 pm

फोटो

तीन रुग्णवाहिका तीन ठिकाणी;  यायला लागले पाच तास!

जालना (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत सर्वासामान्यांची मदार असलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या लेटलतीफ कारभाराचा मंगळवारी (ता.19) चंदनझिरा पोलीसांनाही प्रत्यय आला. जालना शहराजवळ आढळून आलेल्या एका कोरोनाबाधीत बालकाच्या संपर्कातील वृद्धेस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी चंदनझिरा पोलीसांनी जालना शहरातील ढवळेश्वर परिसरातून 108 क्रमांकावर फोन केला. परंतु रुग्णवाहिका तब्बल पाच तासानंतर पोहोचली आणि भर उन्हात ताटकळलेल्या पोलीसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना - राजुर रोडवरील नुतनवाडी येथील अकरा वर्षीय बालक सोमवारी कोरोनाबाधीत आढळून आला होता. हा बालक मुंबईहून त्याच्या बहिणीसह एका वृद्धेसोबत आला होता. त्यामुळे त्याच्या संपर्कातील या वृद्ध महिलेचा शोध घेण्यासाठी मंगळवारी चंदनझिरा पोलीस नुतनवाडी येथे गेले होते. परंतु सदरील महिला ही नुतनवाडी येथून सकाळीच जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जाण्यासाठी पायी निघाली होती अशी माहीती चंदनझिरा पोलीसांना नुतनवाडी येथील ग्रामस्थांनी दिली. त्यानुसार चंदनझिरा पोलीसांनी राजुर-जालना रोडवर सदरील महिलेचा शोध घेणे सुरु केले होते.

चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे व पोलीस उपनिरीक्षक सुनिल इंगळे यांना सदरील वृद्ध महिला ढवळेश्वर परिसरात सकाळी सात वाजेच्या सुमारास आढळून आली. कोरोनाबाधित बालकाच्या थेट संपर्कात आल्याने आणि महिलेस खोकल्याचा त्रास होत असल्याने पोलीसांनी एका झाडाखाली बसवले. महिलेसाठी चहा बिस्कीटाची व्यवस्था करुन पोलीसांनी रुग्णवाहिकेसाठी फोन केला. ढवळेश्वर ते जिल्हा सामान्य रुग्णालय हे अंतर पाच किमी पेक्षा कमी असताना देखील रुग्णवाहिकेस यायला तब्बल पाच तास लागले. दुपारी बारा वाजेच्या सुमारास रुग्णवाहिका आली आणि महिलेच्या संपर्कात कुणी येऊ नये टाकळत उभ्या राहिलेल्या पोलीसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. 


तीनही रुग्णवाहिका काॅलवर 

जिल्हा सामान्य रुग्णलायत तीन रुग्णहिका थांबतात. परंतु मंगळवारी सकाळी अंबड, बापकळ व चांदई टेपली या तीन ठिकाणी रुग्णांना आणण्यासाठी रुग्णवाहिका गेल्या होत्या. त्यापैकी एक रुग्णवाहिका आल्यानंतर तात्काळ निर्जंतुकिकरण करुन पाठवण्यात आली. रुग्णवाहिकेस दोन तीन तास वेळ लागेल म्हणुन सदरील महिलेस वेगळे ठेवण्याच्या सुचना पोलिसांना दिल्या होत्या. अशी माहिती रुग्णवाहिका (108) विभागाचे प्रमुख मनोज जाधव  यांनी दैनिक आनंद नगरीशी बोलताना दिली.

रुग्णवाहिकांची संख्या वाढवा

दरम्यान, ढवळेश्वर येथील नगरसेवक जीवन सले यांनीही नगरपालिका मुख्याधिकारी यांना फोनवरुन रुग्णवाहिका पाठवण्याची विनंती केली होती. परंतु रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने उशिर झाला. त्यामुळे जीवन सले यांनी रुग्णवाहिकांची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920