anandnagri logo
मुख्य बातम्या:

अकरा वर्षीय चिमुकला कोरोनाबाधित

By आनंदनगरी वेब टीम | Mon 18-05-2020 | 09:27:03 pm

फोटो

मुंबई प्रवासाचा आहे इतिहास 

जालना (प्रतिनिधी)- जालना शहराजवळ असलेल्या नुतनवाडी येथील अकरा वर्षीय चिमुकला कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्या पाल्यासोबत हा चिमुकला मुंबईहून जालना शहराजवळ असलेल्या नुतनवाडी या गावात आला होता. अशी माहीती सुत्रांनी दिली.

त्यास कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने डाॅक्टरांनी तपासुन त्याचे लाळेचे नमुने औरंगाबाद येथील प्रयोगशाळेस पाठवले होते. सोमवारी (ता.18) सायंकाळी या चिमुकल्याचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जालना - राजुर रोडवरील नुतनवाडी परिसरातील नागरिक भयभीत झाले असुन आता जालना जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 36 वर पोहोचली आहे.

दरम्यान, हा चिमुकला मुंबईहून आला असल्याने हा कुणासोबत आला? किती जणांच्या संपर्कात होता? याबाबत प्रशासनाद्वारे माहिती घेतल्या जात आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920