anandnagri logo
मुख्य बातम्या:

पतीसोबत कुरबुर; विवाहीतेची आत्महत्या 

By आनंदनगरी वेब टीम | Thu 23-04-2020 | 09:12:49 pm

फोटो

जालना शहरातील आग्रसेन नगरातील दुर्दैवी घटना 

जालना (प्रतिनिधी)- सध्या सर्वत्र लाॅकडाऊन असल्याने कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढत असल्याच्या बातम्या कानावर येत असतानाच जालना शहरातील एका विवाहीतेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे गुरुवारी (ता.23) समोर आले आहे. 

सदर बाजार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना शहरातील अग्रसेन नगर परिसरात वास्तव्यास असलेले शेतकरी सुधाकर विठ्ठलराव जाधव (वय 33) यांची पत्नी सुनिता (वय 30) यांच्यासोबत गुरुवारी कुरबुर झाली होती. त्यानंतर ते सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घराबाहेर पडले होते. यावेळी घरात तीन वर्षाच्या चिमुकल्यासह सुनिता होत्या. 

पती सुधाकर हे 10 वाजता घरी परतल्यानंतर त्यांना त्यांचा मुलगा रडत असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी पत्नी सुनिता यांचा शोध घेतला असता बेडरुममध्ये सुनिता यांचा मृतदेह पंख्याला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे सुधाकर विठ्ठलराव जाधव यांनी पोलीसांना दिलेल्या माहितीवरुन सदर बाजार पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास महिला पोलीस हेड काॅनस्टेबल गिरी करीत आहेत. 

सदर बाजार पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला असल्याचे सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी दैनिक आनंद नगरीशी बोलताना सांगितले. मयत सुनिता यांचे माहेर बुलडाणा जिल्ह्यातील असल्याने त्यांच्या आई-वडिलांसह काही नातेवाईक जालना येथे येत असल्याचेही ते म्हणाले.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920