anandnagri logo
मुख्य बातम्या:

जालनेकरांचा आनंद ठरला क्षणभंगुर

By आनंदनगरी वेब टीम | Wed 22-04-2020 | 11:37:47 am

जालना - परतूर / प्रतिनिधी :- जालना शहरात एकमेव कोरोना बाधित महिलेचा अहवाल उपचारांनंतर आज (ता.21) रोजी निगेटिव आल्याने सर्वत्र आनंदी वातावरण असताना, परतूर तालुक्यातील शेलवडा येथील महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल रात्री प्राप्त झाल्याने जालनेकराचा आनंद क्षणभंगुर ठरला. आतापर्यंत जालना शहरात कोरोनाचा शिरकाव झालेला असला तरी ग्रामीण भागात त्याचा संसर्ग झालेला नव्हता. पण परतूर तालुक्यातील शेलवडा गावातील एका 37 वर्षीय महीलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल आज (ता.21) रोजी रात्री प्रयोगशाळेतून प्राप्त झाल्याने प्रशसनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. सदर महिला ही 13 एप्रिल रोजी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल झाली असता त्याच दिवशी तिच्या स्वाबचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यावेळी तिचा अहवाल निगेटिव आला होता अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली. परंतु काल (ता.20) रोजी पून्हा तिच्या स्वाबचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता त्याचा आहवाल पॉज़िटिव आला आहे. उशीरा प्राप्त झालेल्या अहवाला नंतर प्रशासकीय यंत्रणा तत्काळ कामाला लागली व महीला राहत असलेल्या शेलवडा गावात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी आणी पोलीस दाखल झाली. प्राथमिकता म्हणून महिलेच्या परिवारातील 17 सदस्यांना रुग्णवाहीकेद्वारे तपासणीसाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात रवाना केले. सदर महिला ही गावाच्या शिवारातील शेतात वास्तव्यास होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी सय्यद यांनी दिली .

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920