जालना शहरातील उर्दू हायस्कुल, सेंटमेरी, आरएचव्ही, दानकुँवर आणि सरस्वती भुवनचा निकाल 90 टक्केच्यावर - www.anandnagri.com
anandnagri logo
मुख्य बातम्या:

जालना शहरातील उर्दू हायस्कुल, सेंटमेरी, आरएचव्ही, दानकुँवर आणि सरस्वती भुवनचा निकाल 90 टक्केच्यावर

By आनंदनगरी वेब टीम | Wed 14-06-2017 | 11:46:58 am

फोटो


जालना ( प्रतिनिधी)-इयत्ता दहावीचा निकाल मंगळवारी (दि. 13) जाहीर झाला आहे. त्यात जालना शहरातील पाच शाळांचा निकाल सरासरी 90 टक्क्यांपेक्षा अधिक लागला आहे. त्यात उर्दू हायस्कुल, सेंटमेरी हायस्कुल, आरएचव्ही अर्थात राष्ट्रीय हिंदी विद्यालय, दानकुॅवर कन्या विद्यालय  आणि सरस्वती भुवन हायस्कुलचा समावेश असून, इतर शाळांनी चांगल्या निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. 
प्रामुख्यात शहरातील अग्रगण्य शाळांचा निकाल लक्षात घेतल्यास जिल्हा परिषद हायस्कुलचे 61 विद्यार्थी परिक्षेस बसले होते, त्यापैकी 30 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, या शाळेचा निकाल 49.18 टक्के लागला आहे. जिल्हा परिषद डग्लर्स हायस्कुलचे 141 विद्यार्थी परिक्षेस बसले होते, त्यापैकी 73 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या शाळेचा निकाल 51.77 टक्के लागले आहे. सरस्वती भुवन हायस्कुलचे 456 पैकी 412 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, या शाळेचा निकाल 90.35 टक्के लागला आहे. राष्ट्रीय हिंदी विद्यालयाचे 268 पैकी 260 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, या शाळेचा निकाल 97.1 टक्के लागला आहे. सिटीएमके गुजराती विद्यालयाचे 344 पैकी 309 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, या शाळेचा निकाल 89.82 टक्के लागला आहे. श्री महावीर स्थानकवासी जैन विद्यालयाचे 519 पैकी 421 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, या शाळेचा निकाल 81.11 टक्के लागला आहे. श्रीमती दानकुॅवर हिंदी कन्या विद्यालयाचा निकाल 93.81 टक्के लागला असून, या शाळेचे 100 पैकी 91 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. डॉ. फेजर बाईग हायस्कुलचा निकाल 68.8 टक्के लागला असून, या शाळेचे 47 पैकी 32 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. डग्लर्स गर्लस हायस्कुलचा निकाल 43.33 टक्के लागला असून, या शाळेचे 30 पैकी 13 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्र हायस्कुलचा निकाल 66.14 टक्के लागला असून, 195 पैकी 127 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. श्री शिवाजी हायस्कुलचा निकाल 79.16 टक्के लागला असून, 72 पैकी 57 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. स्वामी विवेकानंद विद्यालयाचा निकाल 65.44 टक्के लागला असून, 139 पैकी 89 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचा निकाल 45 टक्के लागला असून, 21 पैकी 9 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उर्दू हायस्कुलचा निकाल 99.47 टक्के लागला असून, 191 पैकी 190 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. जनता हायस्कूलचा निकाल 51.85 टक्के लागला असून, 27 पैकी 14 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सेंटमेरी हायस्कुलचा निकाल 99.32 टक्के लागला असून, 148 पैकी 147 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. राष्ट्रीय हिंदी विद्यालयाचा निकाल 77.36 टक्के लागला असून, 76 पैकी 59 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920