ठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त
By आनंदनगरी वेब टीम | Tue 07-03-2017 | 11:45:42 am
फोटो
ठाणे (वृत्तसंस्था)- ठाण्याच्या उपवन भागात सापळा रचून पोलिसांनी एक कोटींपेक्षा जास्तीच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. वर्तक नगर पोलिसांनी उपवन येथील राजेश गार्डन हॉटेल जवळ सापळा रचून 1 कोटी 35 लाख 96 हजारांच्या जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा पकडल्या आहेत.
ठाण्यात महिंद्र गाडीतून जुन्या नोटा घेऊन जाणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच एक वाहन जप्तही करण्यात आलं आहे. या जुन्या नोटा कुठे नेण्यात येत होत्या, तसंच एवढ्या नोटा कुठून आल्या, याचा अधिक तपास पोलिसांनी सुरु केला आहे.यापूर्वीही ठाणे गुन्हे शाखेने गोल्डन डाईस नाक्यावर 50 लाखांच्या जुन्या नोटा पकडल्या होत्या. या सर्व नोटा 500 रुपयांच्या होत्या. तसंच नौपाड्यातूनही 46 लाख रुपये युनिट 1 कडून जप्त करण्यात आले होते.
व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California