anandnagri logo
मुख्य बातम्या:

कविता देवनपल्लीची गगन भरारी

By आनंदनगरी वेब टीम | Tue 07-03-2017 | 11:45:40 am

फोटो


♦ पायलट बनुन एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणात सहभाग 
       संजय देशमुख 
जालना -जालन्यातील अनेक नामवंत महिलांनी आपले एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. त्यात येथील डॉक्टर दुबराज देवनपल्ली  यांची मुलगी कविता देवनपल्ली- राजकुमार हिने तिची लहानपणापासूनची इच्छा कठोर परिश्रम आणि तल्लख बुध्दीमत्तेच्या जोरावर पूर्ण केली आहे. आधी आपण ध्येय ठरविले आणि नंतर त्या दिशेने पावले टाकली. त्यात आई-वडिलांसह सर्व परिवाराची जी साथ मला मिळाली त्यामुळेच माझी पायलट बनण्याचे स्पप्न पूर्ण होऊ शकले. विशेष म्हणजे तिचे लग्न देखिल एअर इंडियात असलेल्या राजकुमार यांची झाले. राजकुमार हे सध्या या विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत.
जालन्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक महिलांनी आपली वेगळी छाप पाडलेली आहे. त्यात साहित्य क्षेत्रात सौ. रेखा बैजल, सौ. संजीवनी तडेगांवकर, प्रा. डॉ. सुरेखा मत्स्सावार यांनी तर औद्योगीक क्षेत्रात डॉ. उषा झेहर यांच्या नावाचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. त्यातच परदेशात राहून जापान सरकारच्या शिष्यवृत्तीतुन डेंग्यू-3 या आजारावर संशोधन करुन नविन उपचार पध्दती शोधून काढणारी मंजीरी कुलकर्णी हीदेखील जालन्याची भुमिपुत्र आहे. ती सध्या अमेरीकेतील ईलिनीऑस्‌ विद्यापिठात पिएचडीनंतरचे उच्चशिक्षण घेत असून, तेही अमेरीकन सरकारच्या शिष्यवृत्तीतुन ती पुर्ण करीत आहे. या एकंदरीतच महिला शक्तीचा जागर लक्षात घेता जालन्यास आंतरराष्ट्रीयस्तरावर नेण्याचे काम या शक्तीने केले आहे. त्यातच आता कविता देवनपल्लीने मोठी भर घातली आहे. कविता ही जालना शहरातील रामनगर पोलीस वसाहत भागातील रहिवासी आहे. तिचे प्राथमिक शिक्षण जैन विद्यालय झालेले आहे. तर दहावी व बारावी तीने जेईएस महाविद्यालयातुन पुर्ण केले. त्यानंतर पुढे तिने हैद्राबाद येथील एपी बेगमपेठ भागातील फ्लाईंग इंस्टिट्युटमध्ये पायलट बनण्याचे प्रशिक्षण   घेतले. सुमारे 250 तास विमान उडविण्याचा तीचा अनुभव असून, तोच लक्षात घेवून तिला "एअर इंडियात' पायलट बनण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. ही बाब जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी ठरत आहे. विशेष म्हणजे फ्लाईंग आणि त्यासोबतच सोलो फ्लाईंगचा अनुभवही कविताच्या पाठीशी आहे. सध्या ती चेन्नई येथे एअर इंडियात आंतराष्ट्रीय विमान फायलटच्या ताफ्यात कार्यान्वित असून, वेगवेगळ्या देशांमध्ये एअर इंडियांच्या विमानांची भरारी घेत आहे.
► पालकांचे मार्गदर्शनच ठरले दिशा, आत्मविश्वास महत्वाचा
कविता देवनपल्ली ही लहानपणी चित्रवाहिन्यांवर विविध विमानांची उड्डाणे आणि त्यासंदर्भातील प्रात्यक्षीके बघत असत. तेंव्हाच तिने पायलट बनण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यासंदर्भात पालकांजवळ मत व्यक्त केले. त्यानंतर पालकांनीही कवितामधील पायलट बनण्याचा गुण हेरुन तिला त्या दिशेने मार्गदर्शक केले. त्यामुळेच आता तिचे पायलट बनण्याचे स्वप्न पुर्ण झाले  असून, आपल्या स्वप्नपुर्तीसाठी पालकांचे मार्गदर्शन दिशा ठरल्याचे कविताने सांगितले आहे. यासोबतच मुलींसाठी सर्वच क्षेत्र खुले असून, आपले ध्येय निश्चित करुन आत्मविश्वासाने त्याकडे मार्गक्रमण करावे, असे आवाहन करीत यश निश्चितच मिळेल, असा विश्वास कविताने यानिमित्ताने व्यक्त केला आहे.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920