anandnagri logo
मुख्य बातम्या:

जिल्ह्यात 203 अंगणवाड्या आयएसओ

By आनंदनगरी वेब टीम | Tue 07-03-2017 | 11:45:35 am

फोटो

लातूर (प्रतिनिधी)- बालकं आपल्या शैक्षणिक कार्याची सुरवात अंगणवाडीमधून करत असतात. त्याच अंगणवाडीत एक, दोन, तीन, अ, ब, क,ड चे धडे घेताता. अशा जिल्ह्यातील एकूण 203 अंगणवाड्या या आयएसओ (आंतरराष्ट्रीय मानांकीत ) आहेत. 
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी आधिकारी (महिला व बालकल्याण) केकाण यांनी ही महिती दिली. आजमितीस जिल्ह्यात 2408 अंगणवाड्या आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील 203 अंगणवाड्या या आंतरराष्ट्रीय मानांकीत आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणावर अंगवाड्यामध्ये बालके हे दिसून येतात. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ही पदे ही पूर्ण आहेत. 
अलीकडच्या काळात  जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर इंग्रजी माध्यमांंच्या शाळा सुरू झाल्या आहेत. नर्सरी पासुन ते सीनिअर केजी पर्यंत शिक्षण हे येथे मिळत असल्यामुळे पालकांची ओढ ही इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे होत आहे. वय वर्ष 3-4 पासूनच बालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला जातो. त्यामुळे अलिकडच्या काळात अंगणवाडीत दाखल होणाऱ्या बालकांची संख्या ही प्रचंड कमी झाली आहे. ग्रामीण भागातच काही प्रमाणात अंगणवाड्यात बालकांची संख्या ही जास्त असते परंतू अलिकडच्या काळात गावाच्या जवळपास असणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत बालकांना पाठविले जाते. त्यामुळे अंगणवाडीतील चिमुकल्यांचा चिवचिवाट हा कमी झाला आहे. तरी राज्यशासन हे  अंगणवाड्यामार्फत अनेक  योजना राबवित असल्यामुळे अंगवाड्यातील बालकांना आहार, आरोग्य-उपचार आदी वेळेवर आणि योग्य मिळत असल्यामुळे अंगणवाड्यांची विश्वासार्हता आजही टिकून आहे.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920