anandnagri logo
मुख्य बातम्या:

जलयुक्त शिवारमुळे राज्यातील 11 हजार गावे दुष्काळमुक्त - राज्यपाल

By आनंदनगरी वेब टीम | Tue 07-03-2017 | 11:45:35 am

फोटो

मुंबई (वृत्तसंस्था)- राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाचा प्रारंभ झाला. राज्य सरकारने राबवलेल्या जलयुक्त शिवार योजनेमुळे 11 हजार गावं दुष्काळमुक्त झाल्याचा दावा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केला. राज्यपालांनी आपल्या भाषणात सरकारने गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत राबवलेल्या महत्त्वपूर्ण योजनांचा आढावा घेतला. त्यांच्या भाषणावेळीच शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजीही विरोधकांकडून करण्यात आली.
18 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यासोबतच या अधिवेशनात एकूण 23 विधेयकं सादर केली जातील. तर विरोधकांनीही नोटाबंदी, शेतकऱ्यांची कर्जमाफी, मराठा आरक्षण, ईव्हीएम घोळावर सरकारला घेरण्याची तयारी केली आहे.
 

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920