anandnagri logo
मुख्य बातम्या:

सरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या

By आनंदनगरी वेब टीम | Tue 07-03-2017 | 11:44:57 am

             राजू झनके 
मुंबई - राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत 11हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. या मागण्यांवर आता पुढील आठवड्यात दोन  दिवस चर्चा होईल व  मतदान घेण्यात  येईल.
 बुडालेल्या सहकारी बॅंकांना बॅंकिंग परवाना मिळवून  देण्यासाठी राज्य सरकारने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले. त्यासाठी 116 कोटी 30 लाखांची पुरवणी मागणी  यात सादर करण्यात आली आहे. विधान परिषदेत आमदारांना देण्यात आलेल्या लॅपटॉप तसचे डिटॅचेबल टचस्क्रीन साठी एक कोटी 44 लाखांची तरतूदही या मागण्यांमध्ये करण्यात आली आहे.
राज्य शासनाने बाजारातून घेतलेल्या कर्जांच्या व्याजाची अतिरिक्त तरतूद कऱण्यासाठी सुमारे दीडशे कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागण्यां माध्यमांतून कऱण्यात आली आहे. तर  वाळू लिलाव अनामत रकमा परत करण्यासाठी 2 कोटी  62 लाखांंची तरतूद कऱण्यात आली आहे. उच्च न्यायलयाच्या आदेशानुसार या अनामत रकमा परत कराव्या लागल्या आहेत. नवबौद्ध व अनुसूचित जातींच्या लाभार्थ्यांना घरे बांधून देण्यासाठी शहरी भागा करीता 235 कोटी तर ग्रामीण भागासाठी 280 कोटी असा एकूण 535 कोटींची तरतूद पुरवणी मागण्यांत कऱण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हस्ते अरबी समुद्रातील  स्मारक जलपूजन व भूमीपूजन कऱण्यात आले त्या कार्यक्रमांच्या जाहिरातींच्या आठ कोटी रुपये खर्च पूर्ततेसाठी या पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद करण्यात आली आहे. तर रस्ते व पुलांच्या कामांसाठी आकस्मितता निधीमधून देण्यात आलेल्या 125 कोटी रुपयांचा समावेशही या मागण्यात कऱण्यात आला आहे. विविध शासकीय इमारती दुरुस्तीसाठी 86 कोटी रुपयांची जादा तरतूद करावी लागली. त्याचाही समावेश या मागण्यात करण्यात आला आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना अर्थसहाय्य कऱण्यासाठी आधी 3 कोटी 24 लाखांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती. मात्र आत्महत्यांची संख्या वाढल्यामुळे अतिरिक्त 14 कोटी सात लाखांची तरतूद करण्यात आली आहे. बुडालेल्या सहकारी बॅंकांना बाहेर काढण्यासाठी व त्यांना बॅंकिंग लायसेन्स पुन्हा मिळावे यासाठी राज्य शासनाने पुरवणी मागण्यांद्वारे 116 कोटी 30 लाखांची तरतूद केली आहे तर विधान परिषदेमध्ये आमदारांसाठी लॅपटॉप तसचे 88  डिटॅचेबल टच स्क्रीन घेण्यासाठी 1 कोटी 44 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920