anandnagri logo
मुख्य बातम्या:

उदगीर बाजार समिती निवडणूक; जिकडे-तिकडे फ क्त शिवाजी हुडे

By आनंदनगरी वेब टीम | Tue 07-03-2017 | 11:44:45 am


उदगीर (प्रतिनिधी)-उदगीर बाजार समितीच्या निवडणूकीचा बिगूल वाजला. तसे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांविरूद्ध छुपे डावपेच रचने चालू केले. या डावपेचात कालपर्यंत एका पक्षात असलेला कार्यकर्ता आज दुसऱ्याच पक्षाच्या नेत्याचा कार्यकर्ता बनला आहे. नामांकन प्रक्रिया संपली, छाननी झाली व त्या छाननीत माजी सभापती शिवाजीराव हुडे यांचा अर्ज नामंजूर झाला तसे उदगीरच्याराजकारणात एक प्रकारचा भुकंप झाला. आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने आपल्या पॅनलच्या उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिद्ध के ली नाही. कॉंग्रेस, भाजपा व राष्ट्रवादी हे तिनही पक्ष जरी संपूर्ण ताकदीनिशी आम्ही बाजार समिती निवडणूक लढविणार असे सांगत असले तरी या सर्वांनी आपिलात गेलेल्या शिवाजीराव हुडे यांच्या नावाचा धसका घेतला की काय अशी शंका उपस्थित होत आहे. परवापर्यंत कॉंग्रेससोबत असलेले हुडे नगरपालिकेच्या निवडणूकीच्या तोंडावर भाजपात दाखल झाले. तेव्हापासून भाजपातील काही नेत्यांच्या डोक्यात शिवाजीराव हुडे हे परत बाजार समितीचे सभापती होतात की काय, अशा शंकेने ग्रासून कदाचित तिसरी अघाडी करण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे. आपीलात गेलेल्या हुडे यांचा अर्ज मंजूर झाल्यास कदाचित स्वत: हुडे हेच तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व करण्यास तयार असल्याची चर्चा ही उघड-उघड चालू आहे. त्यामुळे निवडूणूक तोंडावर आली असता भाजपाचे जिल्हाध्याक्षांनी आज रोजी पर्यंत तरी 18 जागेंसाठी निवडणूक होणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. हीच गत कॉंग्रेस पक्षाची आहे. कॉंग्रेस कधी राष्ट्रवादीसोबत युती करून निवडणूक लढवितो किंवा एकला चलो चा नारा देतो हे अद्यापतरी गुलदस्त्यातच आहे. कॉंग्रेसचे नेतेसुदधा शिवाजीराव हुडे यांच्या अपिलावरील निर्णयाची वाट बघत आहेत. अशी चर्चा कॉंग्रेसच्या गटात चालू आहे.  अर्धी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सोबत तर अर्धी रा ष्ट्रवादी ही भाजपाच्या सोबत जाण्यास उत्सुक आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ग्रामीण भागात ताकद असुन सुद्धा विखुरलेल्या नेत्यांचा फ टका हा पक्षाला बसत  आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची चर्चा या निवडणूकीत तरी कोठेच होताना दिसून येत नाही. भाजपाच्या खांद्यावरून खरेदी-विक्री संघाचे चेअरमन झालेले भरत चामले यांनी  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे. दोन मातब्बर पक्ष कॉंग्रेस व भाजपा यांनी शिवाजीराव हुडे यांच्या अपिलावर निर्णय काय येतो यानंतरच आपली भूमिका स्पष्ट करतील व मगच उमेदवारांची यादी जाहीर करतील असे दिसून येत आहे. त्यामुळे सद्या तरी जिकडे तिकडे फ क्त शिवाजीराव हुडे यांचीच चर्चा सुरू आहे.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920