anandnagri logo
मुख्य बातम्या:

माहेश्वरी समाजाचा फाग उत्सव उत्साहात

By आनंदनगरी वेब टीम | Tue 07-03-2017 | 10:44:17 am

फोटो

जालना (प्रतिनिधी)- जालना माहेश्वरी समाजाच्या वतीने आगळ्या वेगळ्या वातावरणाची निर्मिती करीत श्रोत्यांना हर्षोल्हासीत करणारा फाग उत्सव काल रविवारी (दि. 5) उत्साहात साजरा करण्यात आला.
हॉटेल सॅफ्रॉनच्या हिरवळीवर आयोजित या उत्सवात इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथुन आलेल्या मर्दा-मालानी ग्रुपतर्फे होळी सणानिमित्त राजस्थानी नृत्य, गीत आणि मिमीक्रीचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रामगोपाल मालानी, संजय दाड, सत्यनारायण सारडा, किशन भक्कड यांनी महेश पुजन केले. समाजाचे अध्यक्ष कमलकिशोर मालपाणी यावेळी कार्यक्रमाची माहिती दिली. त्यानंतर नृत्य, गीतांचा सांस्कृतीक कार्यक्रम सादर झाला. त्यास उपस्थितांनी भरभरुन दाद देत प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. प्रारंभी डॉ. सौ. शुभांगी सोनी व डॉ. सौ. कविता सोनी यांनी महेश वंदना सादर केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संदीप तापडीया यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार सचिव किशन भक्कड यांनी मानले. यावेळी समाजबांधव, महिला आणि युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920