anandnagri logo
मुख्य बातम्या:

जाफराबाद तालुक्यात बेसुमार वाळू उपसा 

By आनंदनगरी वेब टीम | Tue 07-03-2017 | 10:44:14 am

फोटो

♦ महसूल प्रशासनाचे दूर्लक्ष
♦ शासनाला कोट्यवधींचा लावला जातोय चुना
जाफराबाद (प्रतिनिधी)- तालुक्यात वाळू माफियांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. काही दिवसांपुर्वी रात्रभर सुरु असणारी वाळूचोरी आता दिवासाढवळ्या होत आहे. टिप्परने जाफराबाद शहरासह तालुक्यात वाळू वाहतुक होत आहे. याकडे महसुल प्रशासनो दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांतून केल्या जात आहे. 
वाळू चोरांनी आतापर्यंत कोट्यवधींचा चुना शासनाला लावला आहे. तालुक्यात पुर्णा, धामना, केळना या नद्या असून जाफराबाद, गारखेडा, टाकली, पिंपलकुटा, डावरगाव, बोरगांव यासह आदी भागातून दिवसा ढवल्या वाळू वाहतूक केली जात आहे. वालू तस्करांनी टिप्पर, हायवा, ट्रॅक्टर च्या साह्याने माहोरा, वरुडमार्गे विदर्भात वाळू वाहतुक जोमाने चालवली आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या वाळूच्या वाहनामुळे सर्व सामान्यांचे जीव धोक्यात आले आहे. महसूल,पोलिस, आरटीओ अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याने वाळू तस्करांचे फावल्या जात आहे. 
दिवसेंदिवस हायवा, टिप्पर असी चार पाच वाहने वाळूंची तस्करी करत असल्याने रस्त्यांचे तीनतेरा वाजत आहे. यावर कारवाई का होत नाही, असा सवाल स्थानिक जतना करीत आहे. दररोज 50 वाहने पुर्णा पात्रातुन वाळू भरली जात असून विदर्भात पाठवली जात आहे. 
       जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, जिल्हा पोलिस अधिक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी या वाळू माफियाकडे लक्ष देऊन महसूल प्रशासनाला लाखोचा चुना लावणाऱ्या वाळू तस्कारावर कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांतून हेात आहे. वाळू वाहतुकीमुळे पूर्णा, केलना आणि धामना या नद्यांची पाणी पातळी कमी होत आहे. शिवाय, नद्यांचे सौंदर्यही लोप पावत आहे. नद्यांचे हे विद्रुपीकरण थांबवावे, अशी मागणी सर्व सामान्यातुन केली जात आहे.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920