anandnagri logo
मुख्य बातम्या:

गैरहजर शासकीय सदस्यांना नोटीस बजावणार 

By आनंदनगरी वेब टीम | Tue 07-03-2017 | 10:44:10 am

फोटो

जालना (विशेष प्रतिनिधी) - जालना जिल्हा ग्राहक सरंक्षण मंचाच्या बैठकीस अनेकवेळा गैरहजर राहणाऱ्या शासकीय सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असून, जे अशासकीय सदस्य नेहमीच गैरहजर राहतील त्यांना देखिल स्मरणपत्र देण्यावर बैठकीत चर्चा होऊन निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर यांनी दिली.
नंदकर यांच्या अध्यक्षतेखाली जालना जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हा पुरवठा विभागात पार पडली. यावेळी बीएसएनलचे प्रबंधक के.पी. कुलकर्णी, महावितरणचे एस.के. राऊत, जिल्हा परिषदेचे अधिकारी डी.टी.खडके हे शासकीय सदस्य तर अशासकीय सदस्यांमध्ये रमेश कामड, ज्ञानदेव गव्हाणे, संतोष पवार, मिठू आगलावे, रविंद्र गोल्डे, चंद्रमणी खरात, मोहन नेहरे, भाग्यश्री जगताप आदींची उपस्थिती होती. या वेळी नागरीकांच्या अनेक तक्रारींवर चर्चा करण्यात आली. मागिल बैठकीतील इतीवृत्ताचे वाचन करून मागे केलेल्या कारवाईची माहिती नंदकर यांनी बैठकीत दिली. यापुढे दरमहिन्याला ही जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे नंदकर यांनी सांगितले.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920