anandnagri logo
मुख्य बातम्या:

आजपासून दहावीची परीक्षा

By आनंदनगरी वेब टीम | Tue 07-03-2017 | 10:44:08 am

फोटो

♦ तीस हजार विद्यार्थ्यांसाठी 93 परीक्षा केंद्र 
जालना (विशेष प्रतिनिधी) -  जालना जिल्ह्यात एकूण तीस हजार 666 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. या विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था ही जिल्हाभरातील 93 परीक्षा केंद्रावर करण्यात आली आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी  भरारी पथकासह बैठ्या  पथकांची व्यवस्था करण्यात आली आहे. 
जालना शहरातील सर्व प्रमुख शाळांमध्ये परीक्षा केंद्रांना मान्यता देण्यात आली आली आहे. परीक्षा केंद्राच्या प्रवेशव्दारावच विद्यार्थ्यांची कसून झाडाझडती घेण्यात येणार आहे. केंद्र प्रमुख आणि उपकेंद्र प्रमुखांव्यतिरिक्त कोणालाही मोबाईल परीक्षा  केंद्रात आणता येणार नाही. ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमरे आहेत त्याचे परीक्षा काळातील फुटेज सांभाळून ठेवण्याचे निर्देश संबंधित केंद्रांना देण्यात आले आहेत. तसेच काही संशयास्पद परीक्षा केंद्रावंर व्हिडीओ शुटींगही करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी रमेश तांगडे यांनी दिली आहे. परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, कुठलाही अनुचित प्रकार घडु नये, म्हणून जमावबंदीचे आदेश परीक्षा केंद्र परिसरात लावण्यात आलेले आहेत.
► विद्यार्थ्यांनी एक तास आधीच निघावे 
जालना शहरातील विविध भगाात सध्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे जागोजागी वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी याची दक्षता घेऊन परीक्षेच्या वेळे आधीच एक तास घरून निघावे. जेणेकरून विद्यार्थ्यांचा गोंधळ ऐन परीक्षेत उडणार नाही.   

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920