anandnagri logo
मुख्य बातम्या:

सरकार पोलिसांच्या पाठीशी- मुख्यमंत्री 

By आनंदनगरी वेब टीम | Fri 03-03-2017 | 12:45:26 pm

फोटो


♦ पोलिस आयुक्तालय प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन सोहळा थाटात
♦ 532 खोल्यांची 200 कोटींची इमारत राहणार उभी
औरंगाबाद(प्रतिनिधी)- औरंगाबाद शहरात उभी राहत असलेली पोलिसांसाठीची सर्व सुविधांनी युक्त अशी इमारत हा अतिशय चांगला प्रकल्प असून, 532 खोल्यांची ही इमारत आहे. गेल्या अनेक वर्षापासून पोलिस कर्मचारी शिवकालिन, शाहूकालिन,ब्रिटीश इमारतीत राहत आहेत. या इमारती जुन्या झाल्या असल्याने  नेहमीची मनात ही खंत होती. आपल्या पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी सुसज्ज असे घर असावे. आणि त्यामुळेच राज्यभर पोलिसांच्या घरासंबधी हालचाली सुरु केल्या आहेत. सरकार नेहमीच पोलिसांच्या सर्व प्रश्नासाठी पाठीसी राहणार आहे, असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ डणविस यांनी केले.
औरंगाबाद शहरातील पोलिस आयुक्तालयात उभी राहत असलेली प्रशासकीय इमारत ही पोलिसांसाठी तब्बल 532 खोल्यांची अशी इमारत उभी राहणार आहे. या इमारतीच्या भूमिपूजनाचा सोहळा दि. 2 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान पार पडला. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पोलिस महासंचालक सतिशचंद्र माथुर, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, गृहराज्यमंत्री दिपक केसरकर, खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय सिरसाठ, औरंगाबाद पोलिस आयुक्त अमितेश कुमार, महिला आयोगाच्या विजयाताई राहटकर, आ. प्रशांत बंब आदिंची उपस्थिती होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून पोलिसांना घरे नाहीत. शिवकालिन, शाहूकालिन, बिटीश घरामध्ये ते आजही राहतात. तर ही घरे आता जुनी झाली आहेत. त्यामुळे मला नेहमी ही खंत होती. आणि म्हणूनच आम्ही राज्यभरात पोलिसांसाठी सुसज्ज असे घर बांधण्याचे कार्य हाती घेतले आहे. औरंगाबाद शहरासाठी आलेल्या निधीतून एक चांगली इमारत उभी राहणार आहे. तर यात एक व्यायाम शाळा व एक प्रशिक्षण केंद्रही असायला पाहिजे. यासाठी पोलिस आयुक्तांनी प्रयत्न करुन ती करुन घ्यावेत. असाही सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. औरंगाबाद शहराला स्मार्ट करण्याच्या प्रयत्नातून या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेसह अनेक सुविधा राबवल्या जाणार आहे. असे सांगितले. रिटायर्ड पोलिसांच्या आरोग्याविषयी त्यांनी उपक्रम राबवण्यात येतील असे सांगितले. तर बारा बारा तास कामे करणाऱ्या पोलिसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी, त्यांना रिटायर्ड झाल्यानंतर स्वत:चे घर मिळवून देण्यासाठी त्यांच्या सुखसुविधासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी कार्यक्रमाचे सुरुवातीस  पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले होते. यात पोलिस आयुक्तालय येथे होत असलेल्या इमारतीच्या कामाचा तसेच क्रंाती चौक, तीसगाव या ठिकाणांचा त्यांनी आढावा घेतला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळ्याच्या कोनशिलाचे आनावरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्र्यासह सर्वाचे स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात अनेक राजकिय नेत्यासह अनेक मान्यवरांनी या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थिती दिली होती. कार्यक्रमाच्या शेवटी नागनाथ कोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920