anandnagri logo
मुख्य बातम्या:

उदगीर बाजार समितीत शिवाजी हुडे यांच्यासह 31 जणांचे अर्ज बाद

By आनंदनगरी वेब टीम | Wed 01-03-2017 | 11:24:34 am


उदगीर  (प्रतिनिधी)-माजी सभापती शिवाजीराव हुडे यांच्या उमेदवारीवर काल आक्षेप दाखल झाला होता. त्या अक्षेपाची सुनावणी होत निवडणूक निर्णय अधिकारी श्री कदम यांनी अक्षेपकर्त्यांचा आक्षेप ग्राह्य धरत हुडे यांच्यासह तब्बल 31 जनांचे उमेदवारी अर्ज नामंजुर केल्याने उदगीरच्या राजकारणात भुकंप झाला आहे. ग्रा.पं.च्या अर्थिक दुर्बल घटकात मतदार संघातील सर्वांचे अर्ज रद्दबातल ठरवल्याने हा मतदार संघ निवडणुकीपासून वंचित रहातो की काय? अशी शंका निर्माण झाली आहे.
2012 च्या शिवाजी हुडे यांच्या अर्जावर अक्षेप घेण्यात आला होता. की एकत्र कुटूंबात बाजार समितीचे परवाना धारक असल्यास त्या कुटूंबातील कोणालाही सोसायटी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करता येत नाही. असा अक्षेप असताना 2012 साली तत्कालीन निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी हुडे यांचा अर्ज स्विकृत केला होता. परंतु आता त्याच मुद्दावर हुडे यांचा अर्ज नामंजुर केल्याने निवडणुकी निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. या दोघापैकी कोणाचा निर्णय योग्य हे आता कायद्याच्या किस काढणाऱ्यांनाच माहित. 2 एप्रिल रोजी होणाऱ्या बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपा व कॉंग्रेस असा मुकाबला होण्याची शक्यता असतानाच सभापती पदाचे प्रबळ दावेदार शिवाजीराव हुडे यांचा अर्ज नामंजूर झाल्याने भाजपाकडून सभापती पदाचे उमेदवार कोण ठरतील यावर सुद्धा बरेच काही अवलंबुन आहे. सोसायटी मतदार संघातून जळकोटे शिवलिंग, मुसने धोंडीराम, सोनटके दयानंद, हुडे षिवाजी यांचे अर्ज बाद झाले आहेत. ग्रा.पं.मतदार संघातून खिडसे राधिका, पवार मारोतीराव, पाटील अर्चना, पाटील जयश्री, पाटील षोभा, बाळे संगिता, शेख खाजा मैनोदीन यांचे अर्ज नामंजुर करण्यात आले आहेत. तर ग्रा.पं.च्या अर्थिक दुर्बल घटकातून काळवणे धनंजय, पवार मारोती, लांजे आनिल, चिंचोले बाबुराव, मोमले रमेष तर ग्रा.पं.अनुसूचित जातीमधून अंबेगावे दिलीप, कांबळे शिवदास, कांबळे सचिन, नेत्रगावकर सिमा, भोसले प्रभावती, सुर्यवंशी बालाजी, सुनिल सोमवंषी यांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरवले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात रद्द बातल झालेल्या अर्जामुळे उदगीरच्या सहकार क्षेत्रात एक प्रकारे भुकंप झाला आहे. 2 मार्च रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखे नंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920