anandnagri logo
मुख्य बातम्या:

गोकुंदा गट व गणांतील उमेदवार चाचपणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक 

By आनंदनगरी वेब टीम | Mon 23-01-2017 | 12:55:34 pm

फोटो


किनवट (प्रतिनिधी)- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरूवात केली असून, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने तालुक्यातील सहाही गटांना भेटी देऊन तिथेच बैठक घ्यायची आणि इच्छुक उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांचे मत,अभिप्राय, सल्ला घेऊन योग्य व सक्षम व्यक्तीला उमेदवारी द्यावी असे ठरविले. त्यानुसार शनिवारी(दि.21) गोकुंदा जि.प.गट व त्या अंतर्गत येणारे गोकुंदा व घोटी गणाबाबत विचारविनिमय व उमेदवार चाचपणी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची महत्वपूर्ण बैठक एन.के.गार्डनमध्ये पार पडली.
अध्यक्षस्थानी आ.प्रदीप नाईक व प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.बांधकाम सभापती दिनकर दहीफळे, तालुका अध्यक्ष अनिल पाटील कऱ्हाळे, नगराध्यक्ष साजीदखान, पं.स.चे उपसभापती किशोर चव्हाण, जहीरखान व आत्माराम मुंडे यांची उपस्थिती होती. सन 2012 मध्ये झालेल्या जि.प.निवडणुकीत चुरशीच्या झालेल्या लढतीत मातब्बर उमेदवारांना पराभूत करून रा.कॉं.चे प्रकाश गब्बा राठोड हे गोकुंदा गटातून विजयी झाले होते.त्यानंतर त्यांनी जि.प.चे उपाध्यक्षपदही भूषविले.मात्र,यावेळी गोकुंदा गट हे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)साठी सुटले. त्यामुळे आता प्रकाश राठोड यांना संधी नसल्यामुळे ते आपल्या सौभाग्यवतींना या गटातून निवडणूक रिंगणात उतरवू इच्छितात. त्यांनी आपल्या कार्यकाळात केलेली कामे,विकास याबाबत माहिती देऊन आपण दांडग्या जनसंपर्कामुळे कसे निवडून येऊ शकतो हे सांगितले. गोकुंद्याचे माजी उपसरपंच प्रविण म्याकलवार यांचा जन्मच गोकुंद्याचा असल्याने त्यांचे अनेक खंदे समर्थक, मित्रपरीवार मोठा आहे. ते दर वेळेस सहजपणे ग्रामपंचायतमध्ये विजयी होतात. त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेला गोकुंद्याचा विकास कथन करून आपणही सहज विजय संपादन करू शकतो म्हणून त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याचा आग्रह केला. राजकुमार राठोडही या गटातून आपल्या व्यक्तीला उभे करण्यास इच्छुक दिसले.
गोकुंदा गण हे सर्वसाधारण साठी सुटल्यामुळे गोकुंद्याचे विद्यमान उपसरपंच शेख सलीम शेख मदार हे रा.कॉं.कडून उमेदवारी मिळविण्यास प्रयत्नशील आहेत.त्यांनीही आपला कार्याचा लेखाजोखा बैठकीत सादर केला. गोकुंद्यात ते लोकप्रियही असल्यामुळे त्यांच्याकडे पक्षाचा कल झुकू शकतो असे जाणकारांचे मत आहे.शिवाय चिखली येथील शेख सरूही गोकुंदा गणातून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे दिसले.
गोकुंदा गटातील दुसरा गण घोटी असून,तो यावर्षीच अस्तित्वात आला.हा गण अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी सुटला आहे.तेथील विद्यमान उपसरपंच बालाजी पावडे यांना आपल्या समर्थकांना पंचायत समितीसाठी उमेदवारी मिळावी असे वाटते.त्यांनी घोटीगणातून शंकुतला उत्तम मेश्राम व कौशल्याबाई नागोराव मडावी ही दोन एस.टी.महिला उमेदवारांची नावे सुचविली.रा.कॉं.पक्षाने न्यायबुद्धीने विचार करून आम्ही सुचविलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिल्यास गोकुंदा गटातून जे कोणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार असेल त्यांना निवडून आणण्यासाठी जिवाचे रान करूत असे ते म्हणाले.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करतांना आ.प्रदीप नाईक म्हणाले की,पक्षश्रेष्ठी जे आदेश देतील त्याचे पालन येत्या निवडणुकीत केले जाईल. उद्याच नांदेड येथे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार येत आहेत.कॉंग्रेससोबत युती करून निवडणूक लढवायची की स्वतंत्र लढवायची हा प्रश्र्न नांदेडच्या बैठकीत चर्चिला जाणार आहे.निर्णय कोणताही होवो पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पूर्ण ताकदीने निवडणूकीसाठी तयार रहावे असे सांगितले.या बैठकीस कृउबासचे उपसभापती श्रीराम कांदे,गब्बर काझी,प्रविण म्याकलवार,सतिष वाळकीकर, शेखर नेम्मानीवार, नरसिंग इरपेनवार, सागर नेम्मानीवार, अजित साबळे, राजू नेम्मानीवार, डॉ.रोहीदास जाधव, कचरू जोशी, सुगत नगराळे, देवराव सिरमनवार, देवराव एन्ड्रलवारसह इच्छुक उमेदवार आपापल्या समर्थकांसह हजर होते. सूत्रसंचालन राहूल नाईक यांनी केले.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920