anandnagri logo
मुख्य बातम्या:

निरागस पांडवाविषयी धृतराष्ट्राने नेहमीच असूया बाळगली - प.पू. आचार्य किशोरजी व्यास

By आनंदनगरी वेब टीम | Mon 23-01-2017 | 12:54:18 pm

फोटो

♦ श्री महाभारत कथा ज्ञान-यज्ञ- सत्रात भक्त मंत्रमुग्ध
औरंगाबाद(प्रतिनिधी)- पांडव हे निरागस वृत्तीचे होते. स्वच्छ मनाचे होते. त्यांना जनहिताची काळजी होती. अशा पांडवाची किर्ती वाढत चालली होती. दुसरीकडे दुर्योधन ही धृतराष्ट्राची कमजोरी होती. त्याला दुर्योधनाचे राजकीय हित महत्वाचे वाटायचे. अशा पार्श्वभूमीवर धृतराष्ट्राच्या मनात पांडवाविषयी नेहमीच असूया बाळगलेली होती. असे दि. 22 जानेवारी रोजीच्या कथेतून प.पू. आचार्य किशोरजी व्यास यांनी उपस्थित भक्तांना सांगितले. 
 श्री महाभारत कथा ज्ञान-यज्ञ- सत्राच्या दि. 22 जानेवारी रोजीच्या कथेत पांडवाविषयी त्यांनी सांगितले. यावेळी प.पू. आचार्य किशोरजी व्यास म्हणाले की, पांडवाचे वेगळेपण महाभारतात पाऊलोपावली दिसून येते. पांडव जनतेचे हित जपणारे होते. हे पाचही भाऊ निरागस वृत्तीचे होते. त्यांची भूमिका कल्याणकारी होती. त्यामुळे त्यांची ओळख देशात पसरली होती. त्यांच्या या किर्तीमुळे धृतराष्ट्र नेहमी चिंतीत असे. कारण त्यास नेहमी कौरवाची काळजी असे. त्यामुळे धृतराष्ट्राच्या मनात पांडवाविषयी तिरस्काराची भावना होती. कणकाने याविषयी धृतराष्ट्राला कुटनिती सांगितली होती. सत्तेचे सिंहासन अबाधीत ठेवण्यासाठी शत्रुला झुलत ठेवावे लागते. खरे म्हणजे प्रतिकुल परिस्थीतीत शत्रुला मान द्यावा. व अनुकुल काळात त्याचा सुड घ्यावा. असे त्याने सांगितले होते. असे या झालेल्या कथेतून भक्तांना ऐकायला मिळाले. यावेळी पांडवाविषयीचा एक एक प्रसंग प.पू. आचार्य किशोरजी व्यास यांच्या मुखातून ऐकताना आलेले भक्त कथा ऐकताना मंत्रमुग्ध झाले. आजच्या या कथेतील चौथ्या दिवसाचा दुपारच्या आरतीचा मान अनिल सोनी, विनय सोनी यांना देण्यात आला होता. तर सायंकाळची आरती दिपक पटवे आणि ज्येष्ठ पत्रकार सुंदर लटपटे यांच्या हस्ते करण्यात आली. दि. 23 जानेवारी रोजी 7.30 वाजता गुरुदिक्षा कार्यक्रम होणार आहे.कार्यक्रम यशस्वीतेसाठी रेखा मालपाणी, पुनम सारडा, गोपाल जाजू, राजू चिचाणी, पुरुषोत्तम करवा, बबीता करवा, माधुरी धुप्पड, उषा धूत, पद्‌मा झवर, नीता लोय, आदींनी परिश्रम घेतले.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920