anandnagri logo
मुख्य बातम्या:

शेतीच्या जुन्या वादातुन एकाचा मृत्यू

By आनंदनगरी वेब टीम | Mon 23-01-2017 | 12:53:15 pm

फोटो

♦ पावडे हादगाव येथील घटना; तीन जण गंभीर
सेलू (प्रतीनिधी)- तालुक्यातील हादगाव (पावडे) येथे जून्या शेताच्या वादातून तलवार, चाकू व कुऱ्हाडीने झालेल्या मारहाणीत एकाचा जागीच मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी 21 रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली. या घटनेतील मुख्य चार आरोपींसह अन्य सात ते आठ आरोपींविरूध्द सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. दरम्यान घटनेतील दोन आरोपींना सेलू पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. इतर आरोपींचा सेलू पोलिस शोध घेत आहेत. 
सविस्तर वृत्त असे की, तालूक्यातील हादगाव (पावडे) येथे शनिवारी रात्री नऊच्या सुमारास मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाजवळ व हादगाव (पावडे) बसस्थानकाजवळ जमिनीच्या जून्या वादाच्या कारणावरून संदिप बोकेफोड, सचिन बोकेफोड, संजय बोकेफोड व एक अनोळखी यांच्यासह इतर सात ते आठ (सर्व रा.विद्यानगर,सेलू ) जणांनी मिळून हातात तलवार, चाकू, कुऱ्हाड घेऊन अंगद पावडे (27) रा.हादगाव (पावडे) यास गंभीर जखमी केले. हे भांडण सोडविण्यासाठी गेलेले अंगद पावडे यांचे वडील विजय शालीग्राम पावडे (60) यांना वरिल सवार्ंनी चाकू, तलवार व कुऱ्हाडीने गंभीर वार करून जागीच ठार केले. तसेच भांडण सोडविण्यासाठी गेलेले आप्पासाहेब वेताळ यांच्यावर पण चाकूने वार करून जखमी केले. सेलू पोलिसांनी आप्पासाहेब बाबुराव वेताळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरिल मुख्य चार आरोपींसह इतर सात ते आठ जणांविरोधात गुन्हा नोंद केला असून मुख्य सुत्रधारांपैकी संजय बोकेफोड व शाम कंडारे यांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले आहे. मयत विजय शालीग्राम पावडे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सेलू उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आले. तर गंभीर जखमी असलेल्या अंगद पावडे यांच्यावर परभणी येथील शासकीय रूग्णालयात उपचार सूरू आहेत. तर आरोपी संदीप बोकेफोड व सचिन बोकेफोड यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू असल्याची माहिती सेलू पोलिसांनी दिली. दरम्यान या घटनेचे पडसाद सेलू येथे सोमवारी उमटले. हादगाव (पावडे) येथिल ग्रामस्थ व संभाजी ब्रिगेडचे छगन शेरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी त्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करावी असा आक्रमक पविञा घेतला होता. कायदा व सुव्यवस्था आबाधित राहावी याहेतूने परभणीचे अतिरीक्त पोलिस अधिक्षक विश्व पानसरे यांनी सेलू येथे भेट दिली.यावेळी पानसरे यांनी उर्वरित आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले. शहरात तणावपुर्ण शांतता असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरिक्षक जे.जे.राठोड हे करीत आहेत.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920