anandnagri logo
मुख्य बातम्या:

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी कुस्त्यांची दंगल

By आनंदनगरी वेब टीम | Mon 23-01-2017 | 12:52:46 pm

फोटो

परभणी (प्रतिनिधी)- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राजे संभाजी तालीम परभणी तर्फे  येत्या 26 जानेवारी रोजी वसमत रोडवरील आर.आर. पेट्रोलपंपासमोर सकाळी 11 वाजता भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. 
या कुस्त्यांच्या दंगलीत महाराष्ट्रातील कोणताही पहेलवान सहभागी होऊ शकतो. साखळी पद्धतीने खेळविण्यात येणाया या दंगलीत पहिले बक्षीस 21 हजार रुपये व चांदीची गदा ठेवण्यात आले आहे. या दंगलीचा प्रारंभ शिवसेना खासदार संजय जाधव यांच्याहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, पूर्णेचे उपनगराध्यक्ष विशाल कदम, भाजपा जिल्हाध्यक्ष अभय चाटे, विठ्ठल रबदडे, प्रभाकर वाघीकर, रविराज देशमुख, गटनेते अतुल सरोदे, सुधाकर खराटे, गणेश घाडगे, व्यंकटराव शिंदे, सलगर, दिलीपराव आवचार, अजयराव गव्हाणे, नंदूपाटील आवचार, शेख अली, प्रल्हाद गीते, रामप्रसाद रणेर, नितेश देशमुख, विश्वजित बुधवंत, गुलमीर खान, रामा तळेकर, अमरदिप रोडे, विवेकअण्णा कलमे, संजय सारणीकर, विठ्ठलराव तळेकर, पांडुरंग लोखंडे, गोविंद पारटकर, उद्धवराव मोहिते, विलास आवकाळे आदींची उपस्थिती राहणार आहे. या दंगलीचे आयोजन पहेलवान आण्णा डिघोळे, मारोतराव बनसोडे यांनी केले आहे. 
या दंगलीत पहिले बक्षीस चांदीची गदा व 21 हजार रुपये (विष्णू बनसोडे), द्वितीय 15 हजार (संजय वाळवंटे), तृतिय 11 हजार (अतुल सरोदे), अनुक्रमे चौथे, पाचवे व सहावे 7 हजार रुपये (शेख अली, शकील भाई, दिपक पांडे) तर 5 हजाराचे एवूैण 5 बक्षीसे दादा लुबाळे, गुंडराव, संभानाथ काळे, सय्यद सीराज यांच्यातर्फे देण्यात येणार आहेत. यशस्वीतेसाठी पिंटू डिघोळे, गोवूैळ लोखंडे, राज डिघोळे, अनिल शिंदे, राजेंद्र गाडेकर, अर्जुन पहेलवान, सोनू पवार, योगेश कुरे, योगेश खुडे, परमेश्वर सूर्यवंशी, बबन खनपटे आदी प्रयत्न करत आहेत. 

 

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920