anandnagri logo
मुख्य बातम्या:

सोनपेठ तालुक्यात शिवसेनेला खिंडार

By आनंदनगरी वेब टीम | Mon 23-01-2017 | 12:52:45 pm

♦ जेष्ठ शिवसैनिक सदाशिव कोल्हेकर यांच्यासह शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश
सोनपेठ (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या हालचालींना प्रचंड वेग आला असून तालुक्यातील जेष्ठ शिवसैनिक सदाशिव कोल्हेकर यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी आज पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केल्याने तालुक्यात शिवसेनेला चांगलेच खिंडार पडले आहे.
परभणी येथील श्री लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात भाजपच्या कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या वेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीसह भाजपाचे जिल्हाध्यक्ष आनंदराव भरोसे, अभयराव चाटे, विजयराव गव्हाणे, विठ्ठलराव रबदडे,  संजय रोकडे, व्यंकटराव तांदळे, रामप्रभू मुंडे, बालाजी देसाईं, बाबासाहेब फले, बालाप्रसाद मुंदडा, रमाकांत जहागीरदार, धनंजय देशमुख, सोनपेठ तालुकाध्यक्ष माधव गिरे पाटील आदींची उपस्थिती होती. यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंदराव भरोसे व अभयराव चाटे यांच्या नेतृत्वाखाली  तालुक्यातील डिघोळचे जेष्ठ शिवसैनिक सदाशिव कोल्हेकर, सुभाष सावंत, चंद्रकांत मुळे, गौतम उजगरे, अंकुश फड, गणेश भोसले, यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला. 
सदाशिव कोल्हेकर यांच्या प्रवेशाने सोनपेठ तालुक्यात शिवसेनेला खिंडार पडेल असून कोल्हेकर परिवहन मंत्री दिवाकरराव रावते यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचीत होते. 

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920