anandnagri logo
मुख्य बातम्या:

नोटाबंदीमुळे सहकार क्षेत्र डळमळले- शरद पवार

By आनंदनगरी वेब टीम | Tue 17-01-2017 | 01:27:09 pm

फोटो

औरंगाबाद(प्रतिनिधी)- नोटाबंदीचा आजच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाला चलनासंबधीचे नियोजन नसल्याने आजच्या घडीला सोसायटी, कारखाने, सहकार क्षेत्रातील संस्था डळमळीला आल्या आहेत. तर  पैश्याअभावी रोजगार मिळत नसल्याने, शेतीतल्या मालाला क मी भाव येत असल्याचे व विविध क्षेत्रात कामे उपलब्ध नसल्याने जनसामान्यांवर नोटाबंदीचा परिणाम झाला असल्याचे मत राष्ट्रवादी कॉ.चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
कोकॉन सहकार परिषद 2017 च्या आयोजन औरंगाबाद शहरातील संत तुकाराम नाटयगृह येथे दि. 16 जानेवारी रोजी करण्यात आले होते. यावेळी परिषदेचे उद्‌घाटन  राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सहकार क्षेत्र आणि जनसामान्याच्या प्रश्नाचा वेध घेणारी या परिषदेला यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा.नरेंद्र जाधव, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा. चंद्रकात खैरे, राजेश टापे, अंबादास मानकापे, सुरेश धस, चिकटगावकर, बालभारती महाराज आदींची  उपस्थिती होती. यावेळी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सहकार चळवळ ही यशवंतराव चव्हाण यांच्यापासून उभी झाल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या मातीत ही चळवळ उभी राहीली. आणि मराठवाड्यातही तेवढ्याच ताकतीने ती निर्माण केली. सहकार्याचे वृक्ष अधिक डेरेदार करण्यासाठी व सामान्य माणसांना रोजगार कसा उपलब्ध होईल. यासाठी हा प्रयत्न होता. या चळवळीमागचा मुख्य आधार म्हणजे जनसामान्य माणूस होता. 1890 च्या दशकापासून सुरु झालेली या चळवळीने 19 व्या शतकात जोर धरला होता. असे त्यांनी सांगितले. तर आजच्या घडीला सहकार क्षेत्र डळमळले असल्याचे त्यांनी सांगितले. नोटाबंदीमुळे चलन तुटवडा होऊन पन्ना टक्के आर्थिक व्यवहार कमी झाले. तर 35 टक्के लोक रोजगाराला मुकले. काळा पैसा आणण्यासाठी आजच्या सरकारने केलेला निर्णयात 50 दिवसात सर्व सुरळीत होणार असल्याचे सांगण्यात आले. परंतू पन्नासचे साठ दिवस उलटले. स्वीस बॅंका  माहिती देत नाही.एक दिवसात निर्णय घेवून 15 लक्ष 88 हजार चलन रद्द केले. जनसामान्य माणसाला जवळील पैसे भरण्यासाठी सकाळपासून रांगेत उभे राहावे लागले. तर पैशाच्या तुटवड्याने कारखान्यातील लोकांना कामावरुन बसवले. त्यामुळे सहकार क्षेत्रातील आर्थिक व्यवहार 50 टक्क्याने घसरला तर 35 टक्के लोकांची कामे गेली. नरेगातील रोजगार वाढले. असा परिणाम नोटाबंदीने सहकार क्षेत्र व जनसामान्यावर  झाला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या हस्ते बुलढाणा अर्बन को. ऑपरेटिव्ह सोसायटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स. साखर कारखाना, आदर्श सहकारी नागरी बॅक, नरसिंह सहकारी साखर कारखाना, समर्थ सहकारी साखर कारखाना, वैद्यनाथ साखर कारखाना, घृष्णेश्वर सहकारी संस्था, लोकनेते सुंदरराव सोळुंके साखरकारखाना, आष्टी दुग्ध संघ, जयप्रकाश नारायण स.संस्था, यांना मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. तर स्मरणीचे प्रकाशन आिण गौरव गं्रथाचे प्रकाशन केले. कार्यक्रमात राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा. चंद्रकांत खैरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. अनिल फ ळे यांनी केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मराठवाड्याच्या शेती, ग्रामीण भाग, कारखाने, आद्योगीक क्षेत्र, निघणारे मोर्चे, तरुणांची होत असलेली दिशाभुल याचा वेध घेणारी एक फि ल्म दाखवण्यात आली. या कार्यक्रमाच्या  शेवटी अंबादास मानकापे यांनी उपस्थितींचे व मान्यवरांचे आभार मानले.  
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्यासह मान्यवरांचा गौरव
राष्ट्रवादी कॉंगे्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांना यावेळी मानपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरवीण्यात आले. तर कार्यक्रमासाठी उपस्थितीत असणारे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा. चंद्रकांत खैरे, सुरेश धस, चिकटगावकर, बालभारती महाराज, आदींना स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920