anandnagri logo
मुख्य बातम्या:

दोन महिन्यात जलवाहिनीसह रस्त्यांची कामे मार्गी लावणार: महापौर

By आनंदनगरी वेब टीम | Tue 17-01-2017 | 12:50:43 pm

परभणी (प्रतिनिधी): येत्या दोन महिन्यात जलवाहिनी अंथरण्याच्या कामासह विविध ठिकाणच्या रस्त्यांची कामे मार्गी लावणार असल्याचे आश्वासन महापौर संगीता राजेंद्र वडकर यांनी विद्यापीठ रोडवरील अक्षदा मंगल कार्यालयाच्या जवळील नागरिकांशी संवाद साधतांना दिले.
महापौर संगीता राजेंद्र वडकर, आयुक्त राहुल रेखावार, नगरसेविका अश्विनी वाकोडकर, सौ. मिनाताई शिंदे,राजेंद्र वडकर, प्रमोद वाकोडकर यांनी विद्यापीठ गेट व अक्षदा मंगल कार्यालयाजवळी नागरिकांशी आज संवाद साधला. यावेळी नागरिकांनी विविध समस्या मांडून जलवाहिनीचे काम लवकरच पुर्ण करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. आयुक्त राहुल रेखावार यांनी युआयडीसी अंतर्गत पाईप लाईन अंथरण्याचे काम चालु असुन आपल्या परिसरात येत्या दोन महिन्यांमध्ये पाईप लाईन अंथरण्याचे काम पुर्ण होईल तसेच विद्यापीठ रोड, अक्षदा मंगल कार्यालया समोरील उर्वरीत रोडचे काम मार्च एंड पर्यंत पूर्ण होईल अशी ग्वाही दिली. यावेळी महापौर सौ. संगीता वडकर यांनी नागरीकांना व महिलांना आपल्या परिसरातील समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. आपल्या मुलभूत सुविधा आम्ही लवकरच सोडवू असे त्या म्हणाल्या. यानंतर रामकृष्ण नगर या परिसरात नालीच्या बांधकामाची पाहणी केली. रामकृष्ण नगर भागात पाईप लाईने काम येत्या दोन ते तीन दिवसात सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी त्यांनी नृसिंह नगर, सिद्धीविनायक नगर, विक्रम सोसायटी, आरोग्य कॉलनी, खानाुपर फाटा,प्रगती नगर, मातोश्री नगर आदी परिसरातील नागरिकांची भेट घेवून त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या व त्या येत्या दोन महिन्यात मार्गी लावणार असल्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. तसेच शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी आपला कचरा घंटागाडीतच टाकावा किंवा कचरा कुंडीत टाकावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उजवणकर, काळे, काळे, रवि जाधव आदींसह परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920